ETV Bharat / bharat

Brij Bhushan Sharan Singh: गंगेत मेडल विसर्जित करून मला फाशी होणार नाही, ब्रिजभूषण सिंग यांची दर्पोक्ती

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे आयोजित एका कार्यक्रमात भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मंचावरून कुस्तीपटूंवर जोरदार प्रहार केला. मला फाशी द्यायची असेल तर पुरावे न्यायालयात सादर करा. गंगेत मेडल सोडून काहीही होणार नाही असे ते म्हणाले.

bjp mp brij bhushan sharan singh
बृजभूषण शरणसिंग यांचे कुस्तीपटूंना प्रत्युत्तर
author img

By

Published : May 31, 2023, 7:41 PM IST

Updated : Jun 2, 2023, 2:53 PM IST

बाराबंकी : गंगेत पदक विसर्जनासाठी निघालेले कुस्तीपटू उत्तराखंडमध्ये दाखल झाल्या होत्या. खेळाडूंनी आपली पदके हरिद्वार गंगेत विसर्जित करण्याच्या निर्णयाने संपूर्ण देशात वातावरण ढवळून निघाले आहे. यामुळे देशातील राजकारणात खळबळ उडाली आहे. लैंगिक शोषणासह इतर आरोपांनी वेढलेले भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दिल्लीत कुस्तीपटूंनी आपली मेडल गंगेत फेकण्याचा इशारा दिला होता. यासोबतच सर्व पैलवान गंगेत मेडल फेकण्यासाठी सायंकाळी हरिद्वारला पोहोचले होते. परंतु, नरेश टिकैत यांच्या समजुनंतर शेतकरी नेते तिथेच थांबले आणि त्यांनी सरकारला पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला.

  • #WATCH मैंने कहा था कि अगर एक भी आरोप मेरे ऊपर साबित हो जाएगा तो मैं स्वयं फांसी पर लटक जाऊंगा। आज भी मैं उसी बात पर कायम हूं। 4 महीने हो गए वो मेरी फांसी चाहते हैं लेकिन सरकार मुझे फांसी नहीं दे रही है तो वो (पहलवान) अपना मेडल लेकर गंगा में बहाने जा रहे हैं। मुझ पर आरोप लगाने… pic.twitter.com/6m7dlAJ136

    — ANI_HindiNews (@AHindinews) May 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आरोप सिद्ध झाला तर फाशी घेईन : या संपूर्ण घटनेबाबत भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपटूंना चोख प्रत्युत्तर दिले आहे. अयोध्येत ५ जून रोजी होणाऱ्या जनजागृती रॅलीला पाठिंबा मिळवण्यासाठी बुधवारी बाराबंकीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे ते मंचावरून म्हणाले की, माझ्यावर एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वत:ला फाशी घेईन. आजही मी त्याच गोष्टीवर ठाम आहे. माझ्यावर आरोप होऊन चार महिने झाले आहेत. पण, पैलवानांना काहीही सिद्ध करता आलेले नाही.

पुरावे असतील तर कोर्टात द्या : कुस्तीपटूंना माझी फाशी हवी आहे पण सरकार मला फाशी देत ​​नाही, म्हणून ते मडेल घेऊन गंगेत फेकणार आहेत. मेडल गंगा नदीत फेकल्याबद्दल त्यांना फाशी होणार नाही. उलट असा आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंना मला एवढेच सांगायचे आहे, पैलवानांनो, तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात द्या, कोर्ट मला फाशी देईल. मला हे मान्य आहे. पैलवानांनी सरकारला पाच दिवसांचा इशारा दिला आहे. या दिवसांत ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई न झाल्यास त्यांची सर्व मेडल गंगा नदीत विसर्जित करू, असे कुस्तीपटूंनी मंगळवारी सांगितले होते. मंगळवारी हरिद्वारमध्ये गंगा नदीत मेडल विसर्जित करण्यासाठी गेलेल्या कुस्तीपटूंना शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी समजावले, त्यानंतर ते थांबले.

निर्णय सध्या मागे घेतला: खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई होत नसल्याचा निषेध करणाऱ्या कुस्तीपटूंनी अखेर आपली मेडल गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय सध्या मागे घेतला आहे. त्यांनी केंद्र सरकारला पाच दिवसांचा अल्टीमेट देत पदकाचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा -

  1. Brijbhushan Singh ब्रिजभूषण सिंह यांनी फेटाळले लैंगिक शोषणाचे आरोप म्हणाले डोनाल्ड ट्रम्पही
  2. Wrestlers Protest ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हे दाखल म्हणाले कुठल्याही चौकशीसाठी तयार
  3. Brij Bhushan Sharan Singh ब्रिजभूषण शरण सिंह यांचे प्रियंका गांधींना आव्हान म्हणाले माझ्या विरुद्ध निवडणूक लढवा

Last Updated : Jun 2, 2023, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.