ETV Bharat / bharat

जुगार अड्ड्यावर छापा; 25 जणांसह भाजपा आमदाराला रंगेहाथ पकडलं - गुजरात

गुजरातच्या पंचमहालमध्ये भाजपा आमदाराला जुगार खेळताना अटक करण्यात आली आहे. चमहाल पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा जिल्ह्यातील पावागड शहरालगत असलेल्या रिसॉर्टवर छापा टाकला होता.

केसरी सिंह सोलंकी
भाजपा आमदार
author img

By

Published : Jul 2, 2021, 11:55 AM IST

पंचमहाल - एका भाजपा आमदाराला जुगार खेळताना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सात तरुणींचा देखील समावेश आहे. गुजरातच्या पंचमहालमध्ये ही घटना घडली. अटक झालेल्या आमदाराचं नाव केसरी सिंह सोलंकी असून ते गुजरातमधील खेडा जिल्ह्याच्या मातर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार आहेत.

पंचमहाल पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा जिल्ह्यातील पावागड शहरालगत असलेल्या रिसॉर्टवर छापा टाकला होता. जिथे मोठ्या प्रमाणात दारू सापडली. पोलिसांनी तेथून आमदारासह इतर 25 जणांना अटक केली आहे. यामध्ये 7 महिलांचा देखील समावेश आहे, असे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजदीपसिंग जडेजा यांनी सांगितले.

गुजरात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. यातच भाजपा आमदाराव कारवाई झाल्याने पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. यामुळे मतदारसंघात पक्षांसमोरील अडचणी वाढू शकतात. तर यापूर्वीही जुलै 2020 मध्ये केसरी सिंह सोलंकी चर्चेत आले होते. त्यावेळी राज्यसभा जागांसाठी निवडणुका होत्या. तेव्हा ते काँग्रेस उमदेवाराला साथ देत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. सोलंकी यांचे पक्ष नेतृत्वाशी चांगले संबंध नसल्याचेही बोलले जाते. तथापि, गुजरातसहीत उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये निवडणूक होत आहेत.

हेही वाचा - सोलापूर : अक्कलकोट येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच आरोपी अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.