सीतापूर : संपूर्ण देशातच नव्हे तर संपूर्ण जगात भारतीय जनता पक्षाची क्रेझ ज्या प्रकारे वाढली आहे, ते कुणापासून लपून राहिलेले नाही. प्रत्येकाच्या जिभेवर भाजपच्याच चर्चा आहेत. भाजपचे सरकार आल्याने राम-रामची क्रेझही वाढली आहे. आता बहुतेक लोक नमस्ते ऐवजी राम-राम म्हणणे पसंत करू लागले आहेत. अशा परिस्थितीत प्राणी देखील यापासून अस्पर्शित राहणार नाहीत. दुसरे कोणी नाही, तर विधानसभेतील भाजप आमदार ग्यान तिवारी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : व्हायरल व्हिडिओमध्ये इतर लोकांप्रमाणे कुत्र्यालाही राम-राम म्हणण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. सीतापूर जिल्ह्यातील सेउता विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार ग्यान तिवारी त्यांच्या घरात वाढलेल्या कुत्र्याला हे प्रशिक्षण देताना दिसत आहेत. याचा एक व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला असून तो चांगलाच चर्चेत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये भाजप आमदार कुत्र्याला घरामध्ये राम-राम म्हणण्याचे प्रशिक्षण देत आहे. आमदाराने एक व्हिडिओही बनवला असून तो फेसबुकवर टाकला आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये भाजप आमदार राम-राम म्हणत असताना कुत्रा भुंकतोय. आमदाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, आता माणसांसोबत कुत्रेही राम-रामाचा जप करताना दिसणार असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात सुरू आहे.
कुत्र्याने ३० सेकंदात मारल्या ३२ दोरीउड्या : व्यायामशाळेत जाऊन दोरीउड्या मारून पीळदार शरीरयष्टी बनवताना अनेकांच्या नाकी नऊ येते. ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्यासाठी अनेकांना कंबर कसावी लागते. पण एका पाळीव कुत्र्यानेही माणसांप्रमाणेच गिनीज वर्ल्ड रेकोर्ड करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ३० सेकंदात ३२ दोरीउड्या मारण्याचा विक्रम करून या कुत्र्याने कमालच केली आहे. २०२३ वर्षाच्या सुरुवातीलाच एका कुत्र्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा व्हिडीओ समोर आला आहे. सर्वात चांगल्या प्राण्यांच्या व्हिडीओमध्ये या कुत्र्याच्या व्हिडीओची गणना केली जात आहे. गिनीज वर्ल्ड रेकोर्डच्या इन्स्टाग्रामवर पेजवर जर्मनीतील एका कुत्र्याचा जबरदस्त व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. बालू नावाच्या कुत्र्याने दोरीउड्या मारून विक्रम केल्याने त्याचे मालक वोल्फगॅंग यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
मालकाने कुत्र्याला प्रशिक्षण देण्यासाठी घेतली अपार मेहनत : कुत्र्याने मागच्या पायावर ३० सेकंदात ३२ दोरीउड्या मारल्या. या कुत्र्याने दोरीउड्या मारण्याची कला दाखवून गिनीज वर्ड रेकोर्ड केला. इन्स्टाग्रामवर या कत्र्याचा सुंदर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मालकाने हाता दोरी धरली असून कुत्रा दोरीउड्या मारताना या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या पेजवर हॅशटॅगही देण्यात आले आहेत. व्हिडीओ शेअक केल्यानंतर कुत्र्याचे सोशल मीडियावर कौतुक होत असून हजारोंच्या संख्येत लाईक्सही मिळत आहेत. प्रसिद्ध गायिक अलैनी यांनीही या व्हिडीओला सुंदर प्रतिक्रिया दिली आहे. गुड बॉय, असं कॅप्शन देत या गायिकेने कुत्र्याचे कौतुक केले आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, हे खूप सुंदर आहे. तर तिसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, हे किती मोहक आहे.
हेही वाचा : Dog Thrown From 6th Floor : सहाव्या मजल्यावरुन नराधमाने कुत्र्याला फेकले खाली, आरोपीवर गुन्हा दाखल