इंदूर (मध्यप्रदेश): आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी सध्याच्या काळातील मुला-मुलींच्या जीवनशैली आणि पेहरावावर मोठे विधान केले आहे. कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, आजकाल मला सुशिक्षित मुले-मुली दारूच्या नशेत जाताना दिसत आहेत. मुली असे घाणेरडे कपडे घालून बाहेर पडतात की त्यांना देवी नव्हे तर शूर्पणखा म्हणावे.
मुलींच्या कपड्यांबाबत विजयवर्गीय यांचे वक्तव्य : कैलाश विजयवर्गीय हे इंदूरमध्ये आयोजित जैन समाजाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. जिथे त्यांनी हनुमान जयंतीनिमित्त हे वक्तव्य केले. त्याचवेळी कैलाश विजयवर्गीय यांनी दिलेले हे वक्तव्य चांगलेच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये कैलाश विजयवर्गीय असे म्हणताना दिसत आहेत की, जेव्हाही मला रात्री रस्त्यावर जावे लागते तेव्हा मला मद्यधुंद सुशिक्षित मुली दिसतात. एवढेच नाही तर आजकाल अनेक मुली असे घाणेरडे कपडे घालून रस्त्यावर येतात, की त्यांना पाहून लाज वाटते.
मुली देवीसारख्या दिसत नाहीत : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणाले की, ज्या मुलींना आपण देवी म्हणतो, त्यांना देवाने चांगले रूप दिले आहे, त्यामुळे त्यांनी चांगले कपडे घातले पाहिजेत, पण आता त्यांच्यामध्ये देवीचे रूप दिसत नाही. अशा मुली शूर्पणखासारख्या दिसतात. या वेळी गाडीतून खाली उतरल्यावर नशा निघून जाईल अशा पद्धतीने ५-७ झापड द्यावीत असे वाटते. विजयवर्गीय पुढे म्हणाले की, मी हनुमान जयंतीला खोटे बोलत नाही, मी देवाची शपथ घेतो. ते म्हणाले की, सध्या मुलांमध्ये संस्कार रुजविण्याची नितांत गरज आहे. इंदूर प्रत्येक गोष्टीत पहिल्या क्रमांकावर आहे, पण ज्याप्रकारे अंमली पदार्थांचे व्यसन वाढत आहे. चिंताजनक स्थिती निर्माण होत आहे.
मिनी मुंबईतून दररोज फोटो बाहेर येतात: विशेष म्हणजे इंदूरचे नाईट लाइफ आणि रात्री उशिरापर्यंत तरुण मुला-मुलींच्या हालचाली सतत रस्त्यावर दिसतात. यादरम्यान अनेक मुलींचे अश्लील व्हिडीओ आणि रस्त्यावर होणारे अश्लील कृत्यही समोर आले आहे. दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या मुलींचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही परिस्थिती पाहता माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही इंदूरच्या रात्रीच्या संस्कृतीवर पोलिसांसमोर आक्षेप व्यक्त केला आहे. आता कैलाश विजयवर्गीय यांनाही या प्रकरणी जाहीर प्रतिक्रिया द्यावी लागली. कैलास यांच्या या सल्ल्याचा इंदूरच्या तरुणांवर किती परिणाम होतो हे पाहावे लागेल.