ETV Bharat / bharat

Gujarat Election : भाजपला गुजरातमध्ये पराभवाची भिती ? शरद पवारांची सुचक प्रतिक्रीया

गुजरात विधानसभा (Gujarat Election) निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असतानाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अत्यंत बोलकी प्रतिक्रीया दिली आहे. भाजपला (BJP) गुजरातमध्ये पराभवाची भिती वाटत असुन, पक्षाचा आत्मविश्वास ढासळल्याने अनेकजण चिंतातुर असल्याचं पवार म्हणाले,...जाणुन घेऊयात सविस्तर

Gujarat Election
भाजपला गुजरातमध्ये पराभवाची भिती ? शरद पवारांची सुचक प्रतिक्रीया
author img

By

Published : Nov 27, 2022, 7:37 PM IST

मुंबई : गुजरात विधानसभा (Gujarat Election) निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असुन, मतदानाचे दिवस अगदी तोंडावर आले आहेत. अशातचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अत्यंत बोलकी प्रतिक्रीया दिली आहे. भाजपला (BJP) गुजरातमध्ये पराभवाची भिती वाटत असुन, पक्षाचा आत्मविश्वास ढासळल्याने अनेकजण चिंतातुर असल्याचं पवार म्हणाले. निवडणुका गुजरातच्या आणि महाराष्ट्र सरकारने राज्यात सुट्टी जाहिर केली, असा प्रकार गेल्या 50 वर्षांत कधीचं पाहिला नाही, असं पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांनी आपली भुमिका मांडली.

सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीत स्पष्टता -पवार काल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court on Election Commission) निवडणुक आयुक्त गोयल यांच्या तात्काळ नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उभा करत, यासंदर्भात स्पष्टीकरण मागवलं आहे. यावर शरद पवार समाधानी असल्याचं पाहायला मिळालं. कालपर्यंत सुप्रीम कोर्ट स्पष्टपणे बोलत नव्हते, आज ते बोलायला लागले आहे. हि बाब आशावादी असल्याचं पवार म्हणाले.

गृहमंत्री फडणवीसांनी श्रद्धा प्रकणात लक्ष द्यावे : दिल्लीमध्ये हत्या झालेली तरुणी श्रद्धा वालकर (Shraddha walkar murder case) हिने दोन वर्षांपूर्वी पोलिसांत तक्रार केली होती. त्या तक्रारीकडे लक्ष दिले असते तर श्रद्धा वालकरची हत्या झाली नसती, असे भाजपच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीला टार्गेट करण्यात येत आहे. यावर शरद पवार यांनी भाजपला चौख प्रत्युत्तर दिले असून, आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मागे काय झालं हे न पाहता आता या प्रकरणात त्यांनी योग्य भूमिका घ्यावी असा सल्ला शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.