ETV Bharat / bharat

'भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजपाचं योगदान नाही' - Rajastahan CM Ashok Gehlot in kerala

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत दोन दिवसीय केरळ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आम्ही हे योगदान दिलं, असा दावा भाजप करू शकत नाही, अशी टीका त्यांनी केली.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशो
राजस्थानचे मुख्यमंत्री अशो
author img

By

Published : Jan 23, 2021, 5:49 PM IST

तिरुवनंतपूरम - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत दोन दिवसीय केरळ दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री ते केरळमध्ये पोहचले. गेहलोत यांनी केरळ प्रदेश काँग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांना पक्ष मुख्यालयात संबोधीत केले. यावेळी त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजपाचे कोणतेच योगदान नाही, अशी टीका त्यांनी केली.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भाजपावर टीका

आगामी केरळ विधानसभा निवडणुकीसाठी अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वात अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून तीन सदस्यीय समिति गठित करण्यात आली आहे. यात गोवाचे माजी मुख्यमंत्री लुझिनो फलेरो, कर्नाटकचे माजी उप मुख्यमंत्री जी. परमेश्वर यांचा समावेश आहे.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आम्ही हे योगदान दिलं, असा दावा भाजप करू शकत नाही. भाजपाचे सरकार लोकशाही उद्धवस्त करत आहे, अशी टीका त्यांनी केली. भाजपाने राजस्थानमधील सत्ता पाडण्याचा अपयशी प्रयत्न केला. अद्यापही ते आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करत असून राजस्थान सरकारविरोधात कट रचत आहेत, असे गेहलोत म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल -

केरळमध्ये यंदा विधानसभा निवडणुकांचा बार उडणार आहे. नुकतचं केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार पडल्या आहेत.केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये 941 ग्रामपंचायत आणि 14 जिल्हा परिषदांमध्ये सत्तारुढ डाव्या आघाडीने मोठा विजय मिळवला. 10 जिल्हा परिषद, 152 पंचायत समित्यांमध्ये सीपीएमच्या नेतृत्वातील एलडीएफला विजय मिळाला आहे. तर भाजपने 23 ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवला.

केरळ विधानसभा निवडणूक -

केरळ विधानसभा निवडणूक 2016 ही भारताच्या केरळ राज्यातील विधानसभा निवडणुक होती. 16 मे 2016 रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये केरळ विधानसभेमधील सर्व 140 जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने 91 जागांवर विजयासह सपशेल बहुमत मिळवले व काँग्रेस पक्षाची सत्ता संपुष्टात आणली. या निवडणुकीत प्रथमच भाजपला केरळमध्ये एका जागेवर विजय मिळाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.