पणजी - 2019 मध्ये माझ्यावर गुन्हे होते. तरीही पणजीकरांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला निवडून दिले. त्यामुळे या निवडणुकीत माझ्या चारित्र्याबाबत बोलून उत्पल पर्रिकर यांना मते मिळवता येणार नाहीत, असा टोला भाजपचे पणजीतील उमेदवार आमदार बाबूश मोन्सेरात यांनी ( Babush Monserrat on Goa Assembly election ) लगावला. ते ईटीव्ही भारतशी बोलत होते.
भाजपचे पणजीतील उमेदवार आमदार बाबूश मोन्सेरात ( Babush Monserrat on Goa gov ) म्हणाले, की भाजपने गोव्यात दीड सरकार दिले आहे. या निवडणुकीनंतरही भाजपाला बहुमत मिळून गोव्याला स्थिर सरकार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांच्या चारित्र्यावर आरोप करत अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर ( Babush Monserrat slammed Utpal Parrikar ) विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत.
मात्र, उत्पल यांच्या आरोपांना उत्तर देताना मोन्सरात म्हणाले की 2019 च्या विधानसभा निवडणुकीतदेखील माझ्यावर गुन्हे ( Babush Monserrat on cases ) होते. तरीही पणजीतील लोकांनी मला निवडून दिले होते. माझ्यावर असणारे गुन्हे हे न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे तो काही मुद्दा मतदार लक्षात घेणार नाहीत. दुसऱ्या बाजूला उत्पल मतदारांना भावनिक साद घालत आहेत. त्याबाबत विचारले असता मोन्सेरात म्हणाले की, इथला मतदार त्यांच्या भावनिकतेला साथ देणार नाही.
हेही वाचा-Goa Assembly Election 2022 : पणजीत अटीतटीची लढाई
लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या बंडखोरीवर बोलण्यास नकार
भाजप पक्षाने आणि मी स्वतः माझ्या मतदार संघामध्ये मोठी विकास कामे केली आहेत. मतदार पाठीशी मतदार राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत भाजपा बहुमतात येऊन गोव्याला स्थिर सरकार देईल असेही ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची बंडखोरी ( rebel of Laxmikant Parsekar ) भाजपाला त्रासदायक ठरेल का असे विचारले असता याबाबत त्यांनी जास्त बोलण्यास नकार दिला.