ETV Bharat / bharat

Karnataka Assembly Election: कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपची रणनीती; केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीसह विरोधकांच्या भ्रष्टाचाराला करणार लक्ष्य - कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपची रणनीती

10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी भाजप आपली पूर्ण ताकद लावत आहे. तिकीट वाटपानंतर पक्षांतर्गत गदारोळ झाला होता, मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ती परिस्थिती चांगली हाताळली. आता उमेदवारी प्रक्रिया संपल्यानंतर कर्नाटक निवडणूकीच्या प्रचारासाठी भाजप नवी रणनीती तयार करत आहे.

Karnataka Assembly Election
कर्नाटक विधानसभा निवडणूक
author img

By

Published : Apr 19, 2023, 10:27 AM IST

नवी दिल्ली : दक्षिण भारताचे 'गेटवे' समजले जाणारे कर्नाटक हे भाजपसाठी निवडणूकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. या ठिकाणी भाजपची सत्ता अनेकवेळा प्रस्थापित झाली आहे. सध्या तेथेही भाजपचे सरकार आहे. मात्र, तेथे पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्न करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा पुरेपूर लाभ घेता यावा, अशा पद्धतीने यावेळी निवडणुकीची रणनीती आखण्यात आली आहे.

रॅलीच्या माध्यमातून टार्गेट : केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांचा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ घेणार्‍यांवर भाजपची नजर आहे. त्यांना कोणत्याही किंमतीत आपली व्होटबँक बनवायची आहे. त्यासाठी या योजना आणि या लाभार्थ्यांना बड्या नेत्यांच्या माध्यमातून आपल्या जनसंपर्क आणि रॅलीच्या माध्यमातून टार्गेट करण्याचा डाव पक्षाने आखला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाने असे कार्यक्रम निश्चित केले आहेत, ज्याद्वारे पंतप्रधान आणि इतर वरिष्ठ केंद्रीय मंत्री, केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या कामांची आणि उपलब्धींची आकडेवारी आणि लाभार्थ्यांची संख्या आणि त्यांच्या भाषणादरम्यान सांगण्यात येणार आहे.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सर्वात आक्रमक : याशिवाय पक्षाचे योगी आदित्यनाथ यांच्यासारखे फायरब्रँड नेते आणि हिंदुत्वाचे प्रतीक मानले जाणारे अन्य नेते मुस्लिम आरक्षण आणि तुष्टीकरणाशी संबंधित मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवतील. इतकेच नाही तर पक्षाचे स्टार प्रचारक त्यांच्या भाषणात केंद्र सरकारने सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत दिलेला दिलासा आणि इतर गोष्टींसह किमतीतील कपातीचाही समावेश करतील. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सर्वात आक्रमक असणार आहे. भाजप काँग्रेस आणि विशेषत: राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांच्या सभा आणि भाषणांमध्ये जोरात उपस्थित करून काँग्रेसवर हल्लाबोल करणार आहे.

घराणेशाहीचा मुद्दा निवडणूक प्रचारात : कर्नाटकात जेडीएस आणि काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यासोबतच भाजप घराणेशाहीलाही निवडणूक प्रचारात मुद्दा बनवणार आहे. इतकेच नाही, तर भारतीय जनता पक्ष या निवडणूकीत मोदी आडनावावरून राहुल गांधींनी ओबीसी समाजाविरोधात केलेल्या वक्तव्याचाही जोरदार आवाज उठवणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा मुद्दा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान उपस्थित करू शकतात.

कर्नाटक दक्षिणेकडील राज्यांचे प्रवेशद्वार : एकंदरीत कर्नाटकपाठोपाठ आता तेलंगणातही निवडणुका आहेत. तमिळनाडूतील लोकसभेच्या काही जागांवरही भाजपाचा डोळा आहे, त्यामुळे खुद्द पंतप्रधान या राज्यांवर लक्ष ठेवून आहेत. या राज्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळेच पक्ष कर्नाटकला दक्षिणेकडील राज्यांचे प्रवेशद्वार मानत आहे. या नव्या रणनीतीबाबत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, पक्षाचे प्रभारी अरुण सिंह यांना विचारले असता ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक सभा कर्नाटकात ठरलेल्या आहेत. केवळ निवडणूकीच्या वेळीच पंतप्रधान येत आहेत, असे नाही, तर पंतप्रधान सातत्याने कर्नाटकला भेटही देत आहेत. अशा परिस्थितीत कर्नाटकातील जनतेचा मुख्यमंत्री बोम्मई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे, त्यांना आशा आहे की यावेळी तेथे फक्त भाजपचीच सत्ता असणार आहे.

हेही वाचा : Karnataka Elections 2023: कर्नाटकातील निवडणुकीत उमेदवारांकडून संपत्ती जाहीर; सर्वात श्रीमंत उमेदवार असलेल्या डी शिवकुमार यांची संपत्ती किती?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.