पणजी (गोवा) - मतदारसंघात विकासकामे व पर्यटनाच्या फाइल क्लिअर करण्यासाठी मांद्रे मतदारसंघाचे आमदार पैसे घेत असळताचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोदणकार ( Congress State President Girish Chodankar ) यांनी बुधावारी (काल) केला होता. त्याला आमदार दयानंद सोपटे यांनी प्रतिउत्तर देत चोदणकार विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर सोपटेनी शिवीगाळ करत चोदणकर ( MLA Sopte Burns statue of Chodankar ) यांचा यांचा पुतळा जाळला.
गोवा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष व मांद्रे मतदारसंघाचे आमदार त्यांच्या मतदारसंघात पर्यटन, विकासकामे व अन्य सरकारी फाइल्स क्लिअर करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी घेतात. हा सर्व पैसा हा सरकारी टॅक्स व्यतिरिक्तचा पैसा थेट सोपटे यांच्या खात्यात जमा होत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोदणकार यांनी केला. शिवाय पुराव्यानिशीचा एक ऑडिओ पत्रकार परिषदेत बुधावारी उघड केला. या ऑडिओत सोपटे एका कामासाठी 42 लाख रुपये मागत असल्याचे त्यांनी सांगितले. असले अनेक कृत्य सोपटे करत असल्याचा आरोप करत चोदणकार यांनी या टॅक्सला सोपटे टॅक्स असे म्हटले आहे.
भाजपाने जाळवा पुतळा
भाजपाने चोदणकार यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. रविवारी रात्री त्यांनी चोदणकार यांच्याविरुद्ध खोटे आरोप केल्याचा व आपली बदनामी केल्याचा उल्लेख करत गोवा पोलीस महासंचालक डॉ. इंद्रदेव शुक्ला यांच्याकडे तक्रार दाखल केली. यावेळी सोपटे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान ते काँग्रेस हाऊसपर्यंत मोर्चा काढून चोदणकार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
हेही वाचा - Sandipan Bhumare brother Case : रोहियो मंत्री भुमरेंच्या भावाची दादागिरी, भाजप पदाधिकाऱ्याला केली मारहाण