ETV Bharat / bharat

Goa government cabinet : गोवा सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपचाच वरचष्मा - Goa government cabinet

( Maharashtrawadi Gomantak Party ) भाजपच्या या विजयाचा फार मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री पदावर दावा करणारे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर ( Sudin Dhavalikar party in Goa ) यांच्या पक्षाला फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली म्हणूनच त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा ( Bargaining power of Party in Goa ) दिला.

गोवा सरकार मंत्रिमंडळ
गोवा सरकार मंत्रिमंडळ
author img

By

Published : Apr 9, 2022, 7:24 PM IST

पणजी- अखेर गोव्यात सत्तेत आलेल्या भाजप सरकारने आज आपल्या मंत्रिमंडळाचा दुसऱ्यांदा खाते विस्तार केला. मंत्रिमंडळात भाजपला पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व अपक्षांना वजनदार खाती देण्यात येतील अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. एकाही अपक्षाला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. भाजपने तूर्तास तरी सर्वच खाती आपल्याकडे ठेवून 100 टक्के भाजपचे मंत्रिमंडळ स्थापन केले आहे. मात्र, याला अपवाद ठरला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या एका मंत्र्याचा अपवाद ठरला आहे.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला मंत्रिमंडळात स्थान- राज्यात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार निवडून आले आहे. भाजपला 40 पैकी 20 जागा मिळाल्या आहेत. मात्र निवडणुकीपूर्वी आपली ताकद दाखविणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला ( Maharashtrawadi Gomantak Party ) भाजपच्या या विजयाचा फार मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री पदावर दावा करणारे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर ( Sudin Dhavalikar party in Goa ) यांच्या पक्षाला फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली म्हणूनच त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा ( Bargaining power of Party in Goa ) दिला. त्यातून एखादे खाते आपल्या पदरात पाडून घेण्याची धडपड सुरू केली.

भाजपकडून ऊर्जामंत्री पद मिळण्याची शक्यता- भाजपनेही त्यांना शेवटपर्यंत प्रतिक्षेवर ठेवत कमी महत्त्वाचे खाते देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज त्यांचा शपथ विधी उरकून घेतला. विधानसभा निवडणुकीत भाजपला एक हाती सत्ता मिळाल्यानंतर भाजपच्या काही मंत्र्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला सत्तेत सहभागी करून घेण्यास विरोध दर्शविला होता. मात्र, सुदिन ढवळीकर यांनी केंद्रात नितीन गडकरी यांच्याशी आपल्या ओळखीचा फायदा करून सत्तेत सहभागी होण्याचे स्वप्न सफल करून घेतले. भलेही ढवळीकर यांनी आज शपथ घेतली असली तरी त्यांना भाजपकडून ऊर्जामंत्री हे मध्यम महत्वाचे पद देण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अपक्ष अजूनही वेटिंगवर - अखेर शनिवारी भाजपने उर्वरित तीन मंत्र्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतल्यानंतर अपक्षांची नाराजी दिसून आली. शपथविधी सोहळ्याला काही अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात आपल्याला सामावून घेतले जाईल अशी दक्षिणेतील आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांना शाश्वती होती, मात्र तूर्तास तरी त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले. चंद्रकांत शेट्ये या डिचोलीच्या अपक्ष आमदारांनी भाजपसोबत राहूनच डिचोली चा विकास साधायचे ठरवले आहे त्यातच कॉर्तलीम चे अपक्ष आमदार अंतोन वास यांनी भाजप देईल ते महामंडळ स्वीकारून तूर्तास तरी आपण भाजप सोबत असल्याचे दाखविले आहे. दक्षिणेतील आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांना एखादं महत्त्वाचं महामंडळ देऊन त्यांना पुढची पाच वर्ष आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.

विश्वजीत राणे हे दुसरे मुख्यमंत्री- भाजपला विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळाल्यानंतर सर्व मंत्री पदे आपल्याकडे ठेवण्यात भाजपला यश मिळाले आहे. सुदिन ढवळीकर वगळता कोणत्याही पक्ष किंवा अन्य पक्षातील आमदारांना भाजपने मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले नाही. निवडणुकीपूर्वी भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असणारे डॉ. प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांनी सर्वच महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. तूर्तास तरी राज्यात आपणच बलाढ्य नेते असल्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी दाखवून दिले. मुख्यमंत्रीपदी भलेही प्रमोद सावंत यांची वर्णी लागली असली तरी विश्‍वजित राणे यांच्याकडे सर्व महत्त्वाची खाती सोपविण्यात आली आहेत. त्यामुळे एका बाजूने विश्वजीत राणे हेच राज्याचे शॅडो कॅबिनेट किंवा दुसरे मुख्यमंत्री असल्याचे बोलले जात आहे.

आता स्पर्धा मोठ्या महामंडळासाठी- राज्यात तूर्तास तरी भाजपने निलेश काब्राल , गोविंद गावडे, रवी नाईक माविन गुदिन्हो, सुभाष शिरोडकर, सुभाष फळदेसाई, रोहन खंवटे विश्वजीत राणे, सूदिन ढवळीकर यांना मंत्रीपदे दिली आहेत. तरी राज्यातील उर्वरित आमदारांसोबतच अपक्ष आमदारांना राज्यातील महत्वाची महामंडळे मिळविण्यासाठी आस लागलेली आहे. आलेक्स रेजिनाल्ड, चंद्रकांत शेट्ये, अंतोन वाज यांच्यासोबतच भाजपचे जोषुआ डिसूजा, प्रवीण आर्लेकर जेनिफर मोन्सेरात दिव्या राणे, भाजप आमदार राज्यातील महत्त्वाची महामंडळे आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

हेही वाचा-Mumbai Bank Case : प्रवीण दरेकर हजर व्हा, मुंबई पोलिसांची चौकशीसाठी नोटीस

हेही वाचा-ST Workers Strike : वकील सदावर्ते कामगारांची दिशाभूल करत आहेत : मंत्री अनिल परब

हेही वाचा-Gunaratna Sadavarte Police Custody : गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी, 109 कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.