नवी दिल्ली दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर आज सकाळी टाकलेल्या छाप्यावरुन भाजपने दिल्ली सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. कपिल मिश्रा म्हणाले की सिसोदिया यांचे घोटाळे आता समोर येत आहेत. त्यांनी ट्विट केले की सत्येंद्र जैन यांचा भ्रष्टाचार पकडला गेला आहे. सिसोदिया यांचे घोटाळे आता जनतेसमोर येत आहेत. दारूच्या ठेक्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचे प्रकरण ही तर सुरुवात आहे. केजरीवाल सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आमचा लढा सुरू आहे. दिल्लीला लुटणाऱ्यांना तुरुंगात जावे लागेल.
-
सिसोदिया जी चोर कभी यह नहीं कहता कि मैंने चोरी की है और आप दोनों की जुगल जोड़ी तो वो है जो दिल्ली के Taxpayers के पैसे को डकार गए, अपने शराब मित्रों में बांट दिया, हवाला कारोबार करते हो शर्म नहीं आती क्या बिल्कुल भी भ्रष्टों! https://t.co/xryLHYbyja
— Parvesh Sahib Singh (@p_sahibsingh) August 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">सिसोदिया जी चोर कभी यह नहीं कहता कि मैंने चोरी की है और आप दोनों की जुगल जोड़ी तो वो है जो दिल्ली के Taxpayers के पैसे को डकार गए, अपने शराब मित्रों में बांट दिया, हवाला कारोबार करते हो शर्म नहीं आती क्या बिल्कुल भी भ्रष्टों! https://t.co/xryLHYbyja
— Parvesh Sahib Singh (@p_sahibsingh) August 19, 2022सिसोदिया जी चोर कभी यह नहीं कहता कि मैंने चोरी की है और आप दोनों की जुगल जोड़ी तो वो है जो दिल्ली के Taxpayers के पैसे को डकार गए, अपने शराब मित्रों में बांट दिया, हवाला कारोबार करते हो शर्म नहीं आती क्या बिल्कुल भी भ्रष्टों! https://t.co/xryLHYbyja
— Parvesh Sahib Singh (@p_sahibsingh) August 19, 2022
केजरीवाल यांच्या ट्विटला उत्तर देताना भाजपचे प्रवक्ते हरीश खुराणा म्हणाले की मनीष सिसोदिया प्रामाणिक आहेत. मग ते कारवाईला का घाबरतात. ते म्हणाले की मनीष सिसोदिया भयंकर घाबरलेले आहेत. सीबीआयच्या कोर्टाच्या आदेशाच्या आधारे त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही.
भाजप खासदार प्रवेश साहिब सिंह यांनी ट्विट केले की सिसोदिया जी चोर कधीच म्हणत नाहीत की मी चोरी केली आहे. तुमच्या दोघांची जोडी दिल्लीच्या करदात्यांच्या पैशाची चोरी करतात. हवाला धंदा करताना लाज कशी वाटत नाही नका. त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की केजरीवाल शिसोदिया यांना मद्यमंत्री लिहायला विसरले.
दिल्लीच्या नायबराज्यपालांनी नवीन उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्यातच उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी सांभाळणारे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत.