ETV Bharat / bharat

'राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा भाजपाकडून प्रयत्न' - BJP trying to destabilise Rajasthan govt

राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा आरोप गेहलोत यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केला. यापूर्वीही त्यांनी भाजपावर महाराष्ट्र आणि राजस्थानातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.

अशोक गेहलोत
अशोक गेहलोत
author img

By

Published : Dec 7, 2020, 3:43 PM IST

जयपूर - सरकार पाडण्यावरून राजस्थान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज पुन्हा भाजपावर निशाणा साधला. राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा आरोप गेहलोत यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केला. यापूर्वीही त्यांनी भाजपावर महाराष्ट्र आणि राजस्थानातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.

मुख्यमंत्री गेहलोत यांनी आज सांयकाळी मंत्रीमंडळाची बैठक बोलावली आहे. यामध्ये अनेक मुद्यांवर चर्चा होणार आहे. राज्य सरकारचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे या बैठकीत आतापर्यंत केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला जाईल. तसेच या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात.

महाराष्ट्रातही भाजपाकडून सरकार पाडण्याचे कारस्थान -

राजस्थानातील सरकारला खाली खेचण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो आम्ही यशस्वी होऊ दिला नाही. आता पुन्हा आमचे आणि महाराष्ट्रातील सरकार खाली खेचण्याच्या प्रयत्न भाजपा करत आहे. काँग्रेसशासित राज्यात कट आखून सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. येत्या काळात महाराष्ट्रातही असे कारस्थान दिसू शकते, असे गेहलोत म्हणाले होते.

जुलै महिन्यातील सत्ता नाट्य -

गेल्या जुलै महिन्यामध्ये राजस्थानमध्ये सत्ता नाट्य सुरु होते. काँग्रेस तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि समर्थक आमदारांनी गेहलोत सरकारवर नाराजी दाखवत बंडखोरी केली होती. मात्र, राजीनामा दिला नव्हता. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना सुरक्षित ठेवले होते. सचिन पायलट आणि बंडखोर आमदारांची भेट राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी घेतली. त्यामध्ये आमदारांच्या अडचणी ऐकून घेण्यात आल्या. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी काँग्रेसनेही समिती स्थापन केली. त्यामुळे हा वाद निवळला होता.

हेही वाचा - 'आंदोलन करणारे शेतकरी खरे नाहीत, ते तर शेतात'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.