ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरमध्ये भाजपचे नेते जावेद अहमद दर यांची हत्या - javed Ahmad dar shot in Kulgam

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांनी राजकीय नेत्याला लक्ष्य केल्याचा संशय आहे. भाजप नेत्याची कुलगाम परिसरात हत्या करण्यात आली आहे.

javed Ahmad dar shot in Kulgam
javed Ahmad dar shot in Kulgam
author img

By

Published : Aug 17, 2021, 5:06 PM IST

Updated : Aug 17, 2021, 9:07 PM IST

श्रीनगर- भाजपचे नेते जावेद अहमद दर यांची दक्षिण काश्मीरमधील कुलगाम परिसरात हत्या झाली आहे. ही हत्या दहशतवाद्यांनी केल्याचा संशय आहे. जावेद अहमद दर हे शालीभाग विधानसभा मतदारसंघातील भाजपचे प्रभारी होते.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हे सातत्याने भाजप नेत्यांवर हल्ले करत आहेत. यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते जसबीर सिंग यांच्या निवासस्थानी 13 ऑगस्ट 2021 रोजी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-अफगाणिस्तानात भारताने केली आहे ४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, आता तालिबानी मांडताहेत उच्छाद

जसबीर सिंग यांच्या घरातील इतर चार सदस्यही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. वीरचा राजौरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांनी सांगितले की मुलाचा मृतदेह अंतिम संस्कारांसाठी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

हेही वाचा-पीएफ खात्याकरिता UAN नंबर मिळवण्याकरिता फॉलो करा 'या' स्टेप्स

Last Updated : Aug 17, 2021, 9:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.