नवी दिल्ली - भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण चुग यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना संपूर्ण जम्मू-काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यातून भारताच्या ताब्यात कसा घेता येईल, यावर विचार करण्याचा सल्ला दिला. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
चुग यांनी फारूक अब्दुल्ला आणि मेहबूबा यांच्यावर लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीला आणि दहशतवाद आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तानशी भागीदारी करत असल्याचा आरोप केला. याबाबत खल करण्यापेक्षा अधिकृत जम्मू-काश्मीर पाकच्या ताब्यातून परत घेऊन तो भारताशी कसा जोडता येईल, याचा विचार करावा, असे ते म्हणाले.
'लडाखमध्ये चीनची घुसखोरी आणि दहशतवाद आणि फुटीरतावाद वाढविण्यात पाकिस्तानसोबत भागीदारी करण्याबद्दल बोलण्याऐवजी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरचा उरलेला भाग कसा ताब्यात घेता येईल, याचा विचार करावा. त्याबद्दल चर्चा करावी,' असे चुग यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाला 28 वर्ष पूर्ण! आतापर्यंतचा घटनाक्रम...
'नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी एकेकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक होते आणि आज ते भाजपविरूद्ध एकत्र आले आहेत,' असे ते म्हणाले.
की, 'जम्मू-काश्मीरमधील विकास रोखण्यासाठी वंशवादी नेत्यांनी भ्रष्टाचार व भाई-भतीजावादाला चालना दिली आहे. सत्तेत आल्यानंतर दिवंगत मुफ्ती मोहम्मद सईद यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध भाषण केले होते. मात्र, त्यांनी नॅशनल कॉन्फरन्समधील मोठ्या माशांविरूद्ध कोणतीच कारवाई केली नाही,' असा आरोप चुग यांनी केला.
'जम्मू-काश्मीरमधील वंशवादी राजकारणाची वेळ आता संपली आहे याचे हे लक्षण आहे. गावातून बाहेर पडून स्थानिक उमेदवारांना मतदान करण्यासाठी लोक आता मोठ्या संख्येने येत आहेत, हे पाहून मला आनंद झाला आहे,' असे चुग पुढे म्हणाले.
हेही वाचा - अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या मशिदीचा आराखडा तयार