नवी दिल्ली - संसदेच्या मान्सून अधिवेशनाचा आज पाचवा दिवस पार पडला. आज लोक सभेत दोन विधेयकांना मंजुरी देण्यात आली. लोकसभेत विरोधकांच्या गदारोळात व नारेबाजीत राष्ट्रीय खाद्य प्रौद्योगिकी (तंत्रज्ञान), उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था विधेयक- 2021 ला मंजुरी देण्यात आली. राज्यसभेत ही दोन विधेयके यापूर्वीच मंजूर झाली आहेत.
पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री बनलेल्या पशुपति कुमार पारस यांनी लोकसभे खाद्य प्रौद्योगिकी व उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था विधेयक 2021 सादर केले. यामध्ये हरयाणातील कुंडली आणि तामिळनाडूमधील तंजावर येथील खाद्य प्रौद्योगिकी क्षेत्राच्या दोन संस्थाना राष्ट्रीय स्तराच्या संस्थेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आहे.
राष्ट्रीय खाद्य प्रौद्योगिकी,उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था विधेयक- 2021 (National Institute of Food Technology Entrepreneurship and Management, Bill) मध्ये परीक्षा आयोजित करने, पदवी, डिप्लोमा प्रमाणपत्र आणि अन्य विशेष उपाधी तथा मानद पदव्या प्रदान करण्याचे प्रावधान आहे.
पशुपति कुमार पारस यांना सात जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय खाद्य आणि प्रक्रिया मंत्री बनवले होते.