मोतिहारी (बिहार) : बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात बनावट दारूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. एकूण मृतांचा आकडा आता 40 वर पोहोचला आहे. मात्र, अधिकृत आकडेवारीनुसार 31 जणांचा मृत्यू झाला आहे. पैकी 10 मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. दारू पिऊन आजारी पडलेल्या लोकांच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढते आहे.
मृतांचा आकडा 40 च्या पुढे : बिहारच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नवीन अपडेट्स समोर येत आहेत. आता लोक उघडपणे आपल्या नातेवाईकांच्या मृत्यूबद्दल सांगण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र आताही काही लोक पोलिसांपासून लपवत विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सदर रूग्णालयात आजारी लोकांची येण्याची प्रक्रिया सुरू आहे. रुग्णालयात डझनभर लोक उपचार घेत आहेत. त्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
31 मृत्युंची पुष्टी : जर आपण सरकारी आकडेवारीबद्दल बोललो, तर मोतिहारीमध्ये विषारी दारू पिऊन मृत्यू झालेल्यांची संख्या 31 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 26 दारू तस्करांसह 183 जणांना अटक करण्यात आली आहे. 10 मृतांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. 9 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आठ जणांची दृष्टी गेली आहे. येथे एसपींनी या प्रकरणी तुर्कौलिया, हरसिद्धी, पहारपूर, सुगौली आणि रघुनाथपूर ओपी प्रभारी यांना निलंबित करून स्पष्टीकरण मागितले आहे. याआधी एएलटीएफचे दोन अधिकारी आणि नऊ चौकीदारांना निलंबित करण्यात आले आहे.
अनेकांवर उपचार सुरू : पूर्व चंपारणमध्ये गेल्या 24 तासांत दारू पिऊन पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. सद्यस्थितीत सदर रुग्णालयात 11 जणांवर उपचार सुरू आहेत, तर जिल्हय़ातील बाधित पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सतत मद्यसेवनामुळे आजारी असलेल्या संशयित रुग्णांना रुग्णवाहिकेद्वारे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हे ही वाचा : Abusive Language On LED Screen : भररस्त्यात टीव्हीवर सुरु झाला शिवीगाळ असलेला व्हिडिओ! जाणून घ्या पुढे काय झाले..