ETV Bharat / bharat

Crime News : बॅंकेत दिवसाढवळ्या दरोडा, 1 एक कोटीहून अधिक रक्कम लुटली - one crore looted from bank

बिहारच्या वैशाली येथील बँकेतून एक कोटीहून अधिक रक्कम लुटण्यात आली. पोलीस सीसीटीव्ही फुटेज चेक करत असून तपास सुरू आहे. भरदिवसा झालेल्या या लुटीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. (one crore looted from bank)

Crime News
अ‍ॅक्सिस बॅंकेत दरोडा
author img

By

Published : Aug 1, 2023, 6:26 PM IST

बॅंकेत दिवसाढवळ्या दरोडा

वैशाली (बिहार) : दरोडेखोरांनी शस्त्रांच्या जोरावर बँकेत तब्बल एक कोटींचा दरोडा येथे टाकला. शहराच्या लालगंज परिसरातील अ‍ॅक्सिस बँकेतून ही रक्कम लुटण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. मात्र भरदिवसा बँक लुटण्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे (one crore looted from bank).

प्रकरणी तपासात गुंतले : सध्या पोलीस या प्रकरणी तपासात गुंतले आहेत. अद्याप किती दरोडेखोर होते? ते बॅंकेत कसे आले? कोणाच्या हातात शस्त्रे होती?, याबाबत कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. या घटनेबाबत कोणताही अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाही. लुटीची रक्कम किती होती हेही पोलिसांना स्पष्टपणे सांगता आले नाही. तरीही एक कोटींहून अधिक रक्कम लुटण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी पोहचलेले पोलीस पथक घटनेच्या प्रत्येक मुद्द्याचा तपास करत आहेत. या दरोड्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण आहे.

अ‍ॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापनाकडून सुमारे एक कोटी रुपयांचा दरोडा पडल्याचे सांगण्यात येत आहे. आम्ही तपासाला सुरुवात केली आहे. आम्हाला आशा आहे की या प्रकरणाचा छडा लावला जाईल. बँकेत एक गार्ड आहे, मात्र त्याच्याकडे शस्त्र नाही. आम्ही तपास करून दोषींना अटक करू. लुटलेली रक्कम परत मिळवण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. - पंकज कुमार, आयजी, मुझफ्फरपूर

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू : बँकेत दरोडा पडताच ही बातमी परिसरात आगीसारखी पसरली. यानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी होऊ लागली. पोलीस बँकेच्या आजूबाजूच्या दुकानांमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. दरोड्यादरम्यान चोरट्यांनी सीसीटीव्हीची हार्ड डिस्कही सोबत नेल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, बँक उघडताच चोरटे तेथे पोहोचले आणि त्यांनी बँक लुटली. काही कर्मचाऱ्यांनी ते नुकतेच बॅंकेत आल्याचे सांगितले. त्यांना याबाबत काहीच माहिती नाही.

गुन्हेगारांचे पोलिसांना खुले आव्हान : लालगंजमध्ये मोहरमनंतर काल रात्री तीजचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डीएसपी, डीडीसी, एसपींपासून जिल्ह्यातील सर्व बडे अधिकारी हजर होते. असे असतानाही चोरट्यांनी बेधडक बँक लुटल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणी एका महिलेने रेकी केल्याचेही उघडकीस आले आहे. मात्र, आयजी पंकज कुमार यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नाही.

हेही वाचा :

  1. National Flag Tampered In Muharram : संतापजनक! मोहरमच्या मिरवणुकीत राष्ट्रध्वजाशी छेडछाड, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
  2. Thane Crime: चांदीच्या गदेसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास करणाऱ्या दोन चोरट्याला भिवंडीतून अटक
  3. Mortgage for Tomato : टोमॅटोसाठी कायपण; चक्क दोन अल्पवयीन मुलांना दुकानदाराकडे ठेवले गहाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.