ETV Bharat / bharat

Crime News : धक्कादायक! अवघ्या 100 रुपयांसाठी बापाने पोराचा गळा चिरला! - Crime News

समस्तीपूरमध्ये मद्यधुंद पित्याने आपल्या तीन वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केला. पती-पत्नीच्या वादातून ही घटना घडली आहे. सध्या आरोपी फरार आहे. पोलीस त्याच्या शोधात गुंतले आहेत.

Crime News
खून
author img

By

Published : Jul 26, 2023, 6:52 PM IST

समस्तीपूर (बिहार) : बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका मद्यधुंद बापाने आपल्या निष्पाप मुलाची गळा चिरून हत्या केली. गुन्हा केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना मोहिउद्दीननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भदैया गावात घडली आहे.

मुलाच्या मानेवर कोयत्याने वार केले : समस्तीपूर जिल्ह्यातील भदैया गावात एका पित्याने आपल्या तीन वर्षांच्या निष्पाप मुलाच्या मानेवर कोयत्याने वार केले. यामुळे बालक गंभीर जखमी झाले. बालकाच्या आईने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बालकाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला.

पत्नीशी भांडणानंतर हत्या : मिळालेल्या माहितीनुसार, मुलाची हत्या करणारा पिता कुंदन साहनी मंगळवारी संध्याकाळी मद्यधुंद अवस्थेत घरी आला होता. त्याने पत्नीकडे 100 रुपये मागितले. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. दरम्यान, कुंदन पत्नीला कोयत्याने मारण्यासाठी धावला. त्यामुळे भीतीने पत्नी तेथून पळून गेली. त्यानंतर कुंदनने शेजारी झोपलेल्या निरागस मुलाच्या मानेवर वार केले. या घटनेनंतर तो तेथून फरार झाला.

पैशावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर ही घटना घडली. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. आरोपी वडिलांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याला पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. - गौरव प्रसाद, एसएचओ, मोहिउद्दीन नगर, समस्तीपूर

मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू : जेव्हा पत्नीने घरी आल्यावर आपल्या मुलाला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिले तेव्हा तिने जोरात टाहो फोडला. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी मुलाला तातडीने स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र मुलाची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात रेफर केले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा :

  1. Police Firing In Bihar : बिहारमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट, पोलिसांच्या गोळीबारात तिघांचा मृत्यू
  2. Crime News : BSF जवानाचे धक्कादायक कृत्य! एकाच कुटुंबातील चार जणांवर केला तलवारीने हल्ला
  3. Bihar Crime News : डान्सरचा 10 हजारात सौदा, 7 दिवस बंधक ठेवून केला 15 नराधमांनी बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.