ETV Bharat / bharat

Nitish Kumar Attack On Bjp : मेलो तरी बेहत्तर पण भाजपसोबत युती करणार नाही, नितीश कुमारांचा पलटवार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. मेलो तरी बेहत्तर मात्र भाजपसोबत युती करणार नसल्याचे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी निवडणुकांचे पडसाद आतापासूनच बिहारच्या राजकारणावर पडत आहेत. विरोधी पक्षनेते सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्यासोबत कोणतीच तडजोड न करण्याचे अमित शाहंचे स्पष्ट आदेश असल्याचे म्हटले होते.

Nitish Kumar Attack On Bjp
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 30, 2023, 3:41 PM IST

मेलो तरी बेहत्तर पण भाजपसोबत युती करणार नाही, नितीश कुमारांचा पलटवार

पटना : बिहारमध्ये भाजपने अनेकांना संधी दिली आहे, मात्र यापुढे भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता सम्राट चौधरी यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जोरदार पलटवार केला आहे. मेलो तरी बेहत्तर मात्र भाजपसोबत युती करणार नसल्याचा पलटवार नितीश कुमार यांनी केला. त्यामुळे नितीश कुमार आणि बिहार भाजपमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे.

भाजप भांडणे लावण्याचे काम करत आहे : मुख्यमंत्री नितीश कुमार हे महात्मा गांधींच्या स्मृतीदिनी गांधीघाटावर त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी गेले होते. यावेळी नितीश कुमार यांनी भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले. तरुण पीढीने महात्मा गांधींच्या बलिदानाला विसरता कामा नये, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. भाजप आपापसात भांडणे लावण्याचे कारस्थान रचत असल्याचा आरोपही नितीश कुमार यांनी यावेळी लावला. त्यामुळे भाजपची ही चाल आपण लक्षात घेतली पाहिजे असेही मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावेळी स्पष्ट केले.

मरेन पण भाजपसोबत युती करणार नाही : नितीश कुमार यांच्या पक्षाने बिहारमध्ये भाजपसोबत सत्ता स्थापन करुन राज्य केले. मात्र त्यानंतर नितीश कुमार यांनी अर्ध्यातच भाजप सरकारचा टेकू काढला आणि सराकर अल्पमतात आले. त्यानंतर नितीश कुमार यांनी आपली वेगळी चूल मांडली. त्यावर पुन्हा भाजपसोबत सत्ता स्थापन करणार का असे विचारले असता, नितीश कुमार यांनी भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. मेलो तरी बेहत्तर मात्र भाजपसोबत पुन्हा जाणार नसल्याचे नितीश कुमार यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपपासून वेगळे झाल्यामुळे ते आता काहीतरी भानगडी करण्याच्या चक्करमध्ये आहेत. मात्र आता पुन्हा आपण भाजपसोबत जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपने लालूंवर गुन्हे दाखल केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नितीश कुमार सोबत कोणतीच तडजोड होणार नाही : भारतीय जनता पक्ष आगामी निवडणुकीची जोरदार तयारी करत आहे. त्यामुळेच भाजपची प्रदेश समितीची बैठक दरभंगा येथे आयोजित केली होती. या बैठकीला प्रदेश कार्यसमितीचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी माध्यमांना बोलताना सम्राट चौधरी यांनी गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी स्पष्टपणे नितीश कुमार यांच्यासोबत कोणताच तडजोड होणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप नितीश कुमार यांच्यासोबत युती करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - kailash kher attacked : गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला; दोघांना घेतले ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.