ETV Bharat / bharat

Student Agitation in Bihar : रेल्वे आणि एनटीपीसी विरोधात आज बिहार बंद; राजकिय पक्षांचा बंदला पाठिंबा - बिहार एनटीपीसी भरती

बिहारमधील अनेक शिक्षक आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. पाटण्यातील एक प्रमुख शिक्षक खान सर यांनी आरोप केला होता की ज्यांनी पहिली परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांच्यावर रेल्वे मंत्रालयाने अतिरिक्त परीक्षेचा भार टाकला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर पाटणा येथील प्रख्यात कोचिंग इन्स्टिट्यूटच्या अन्य १५ शिक्षकांसह त्याच्यावर विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

आज बिहार बंद
आज बिहार बंद
author img

By

Published : Jan 28, 2022, 9:43 AM IST

पाटणा (बिहार) - अखिल भारतीय विद्यार्थी संघटना (AISA) आणि इतर युवा संघटनांनी रेल्वे भर्ती बोर्डाच्या ( Railway Recruitment Board ) निषेधार्थ आज राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यामुळे बिहारमधील विद्यार्थी आणि तरुणांचा संताप ( Political Party Supports to Band ) मावळण्याची शक्यता आहे. या संपाला अनेक राजकीय पक्षांचाही पाठिंबा आहे. बिहार महागठबंधनचे सर्व घटक पक्ष विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुढे येत असताना जन अधिकार पक्षाच्या सर्व शाखांनीही बंदला ( Bihar Band ) पाठिंबा दिला आहे. विद्यार्थी संघटना इंकलाब, नौजवान सभेनेही बंदच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे.

राजकिय पक्षांचा बंदला पाठिंबा
राजकिय पक्षांचा बंदला पाठिंबा

परीक्षेच्या निकालात कथित हेराफेरी व्यतिरिक्त विद्यार्थी-तरुणांवरील लाठीचार्ज, खटला दाखल करणे आणि त्यांच्या आंदोलक सहकाऱ्यांच्या अटकेच्या विरोधात राज्यव्यापी बंद पुकारला आहे. गुरुवारी महाआघाडीतील सर्व घटक पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारकडून विद्यार्थ्यांविरोधात अवलंबिल्या जात असलेल्या वृत्तीचा निषेध करण्यात आला. यावेळी राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी बिहार बंदला पाठिंबा जाहीर करण्यासोबतच सरकारला कडक इशारा दिला. जारी केलेल्या संयुक्त निवेदनात आरजेडी, काँग्रेस, सीपीआय आणि सीपीआय (एम) यांचा समावेश आहे. “बिहारमध्ये देशातील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. आणि बेरोजगारीचा दर सर्वाधिक आहे. केंद्र आणि बिहार सरकारकडून विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे. त्यांना नोकऱ्यांचे आश्वासन देत असतात पण जेव्हा नोकरीच्या मागणीसाठी रस्त्यावर येतात, तेव्हा नितीश कुमार सरकार त्यांच्यावर लाठ्यांचा वर्षाव करते" असे निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, एडीएतील घटकपक्ष हिंदुस्थानी अवाम मोर्चा ( Secular ) चे प्रमुख माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी हेही आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उतरले आहे. पाटणा येथील कोचिंग इन्स्टिट्यूटच्या अनेक शिक्षकांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या पार्श्वभूमीवर मांझी यांनी गुरुवारी सांगितले की असे पाऊल विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्यास मदत करू शकते. तसेच खान सरांसारख्या शिक्षकांविरुद्धच्या एफआयआरमुळे विद्यार्थ्यांना अघोषित आंदोलनासाठी चिथावणी मिळू शकते. सरकारने बेरोजगारीवर बोलण्याची आणि तोडगा काढण्याची वेळ आली आहे, असे मांझी म्हणाले.

शिक्षकांवर गुन्हे दाखल -

बिहारमधील अनेक शिक्षक आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. पाटण्यातील एक प्रमुख शिक्षक खान सर यांनी आरोप केला होता की ज्यांनी पहिली परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांच्यावर रेल्वे मंत्रालयाने अतिरिक्त परीक्षेचा भार टाकला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर पाटणा येथील प्रख्यात कोचिंग इन्स्टिट्यूटच्या अन्य १५ शिक्षकांसह त्याच्यावर विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पाटणाच्या पत्रकारनगर पोलीस ठाण्यात विविध कोचिंग इन्स्टिट्यूटच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रस्त्यात अडथळा निर्माण करणे, दंडाधिकारी व पोलिसांचा अवमान करणे, रस्त्याची तोडफोड केल्याप्रकरणी तीन ते चारशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे. इतर आरोपांसह रहदारी, सार्वजनिक मार्गात अडथळा आणल्याबद्दल आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.