ETV Bharat / bharat

वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात..

आज दिवसभरातील या घटनांवर राहणार विशेष लक्ष...

big news and events of 9 january
वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात..
author img

By

Published : Jan 9, 2021, 2:51 AM IST

आज प्रवासी भारतीय दिवस

९ जानेवारी १९१५ या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात आले. त्यानिमित्ताने या दिवसाचे आयोजन केले जाते. देशातील कोरोना साथीमुळे यंदा १६व्या प्रवासी भारतीय दिनाचे आयोजन ऑनलाईन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे उद्घाटन करतील. महात्मा गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला.

big news and events of 9 january
महात्मा गांधी

शेतकरी आंदोलनाचा ४५वा दिवस

कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज ४५वा दिवस आहे. दिल्लीच्या सीमांवर प्रमुख ४० शेतकरी संघटनांसह, देशभरातील सुमारे ५०० शेतकरी संघटनांचे हजारो शेतकरी ठाण मांडून आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आलेल्या थंडीच्या लाटेमध्येही हे शेतकरी सीमांवरतीच बसून आहेत. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, आणि एमएसपी लागू करावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी ही आंदोलने सुरू आहेत.

big news and events of 9 january
शेतकरी आंदोलनाचा ४५वा दिवस

पंतप्रधान मोदींची नीती आयोगातील तज्ञांशी बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नीती आयोगातील तज्ञांशी बैठक घेणार आहेत. आगामी सर्वसाधारण अर्थसंकल्प पाहता अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीवर बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. या बैठकीत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि अन्य वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील.

big news and events of 9 january
पंतप्रधान नरेंद्र मोदी

सोनियांची वरिष्ठ नेत्यांसमवेत बैठक

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत बैठक घेणार आहेत. या बैठकीत किसान आंदोलनावर चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे.

big news and events of 9 january
सोनिया गांधी

वीज चोरीशी संबंधित विशेष लोक अदालत

उत्तर आणि वायव्य दिल्लीतील ७०लाख लोकसंख्येला वीजपुरवठा करणारी प्रमुख वीज कंपनी टाटा पॉवर डीडीएलकडून वीज चोरीशी संबंधित खटला चालवण्यासाठी आज ९ जानेवारी रोजी विशेष लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत विशेष लोक अदालत होणार आहे.

big news and events of 9 january
वीज चोरीशी संबंधित विशेष लोक अदालत

महाराष्ट्र हवामान

आज उत्तर महाराष्ट्र मध्ये, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता.

मुंबई, ठाणे २७-२८ डिग्री सेल्सिअस

नंदूरबार, धुळे २२-२४ डिग्री सेल्सिअस

विदर्भ ३५ डिग्री सेल्सिअस

big news and events of 9 january
महाराष्ट्र हवामान

पुण्यात कमी दाबाने पाणीपुरवठा

पुणे शहराच्या सर्व भागातील पाणीपुरवठा काल (शुक्रवार, दि. ८ जानेवारी, २०२१) देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे बंद राहिला. आज शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

big news and events of 9 january
पुणे पाणीपुरवठा

सिडनी कसोटीचा तिसरा दिवस

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील तिसरा सामना सिडनी येथे होत आहे. या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर भारताने २ बाद ९६ धावा केल्या. अनुभवी स्टीव्ह स्मिथचे शतक (१३१) आणि मार्नस लाबूशेन, विल पुकोव्हस्कीची अर्धशतके यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ धावांपर्यंत मजल मारली. आज या कसोटीचा तिसरा दिवस आहे.

big news and events of 9 january
सिडनी कसोटी

आजपासून रंगणार आय-लीग फुटबॉल स्पर्धेचा थरार

आय-लीग फुटबॉल स्पर्धेचे १४वे पर्व आजपासून सुरू होणार आहे. सर्व सामने कोलकात्यात रंगणार आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना करून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

big news and events of 9 january
आय लीग

फ्लिपकार्ट सेलचा शेवटचा दिवस

फ्लिपकार्टवर ५ जानेवारीपासून सुरू झालेल्या Flipkart Realme Days Sale चा आज शेवटचा दिवस आहे. फ्लिपकार्ट रियलमी डेज २०२१ सेलमध्ये रियलमीचे स्मार्टफोन्सला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या सेलमध्ये Realme X3 आणि Narzo 20A सह अनेक दुसऱ्या स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जात आहे.

big news and events of 9 january
फ्लिपकार्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.