ETV Bharat / bharat

वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात.. - todays big events

आज दिवसभरातील या घटनांवर राहणार विशेष लक्ष...

big news and events of 5 january
वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात..
author img

By

Published : Jan 5, 2021, 4:22 AM IST

शेतकरी आंदोलनाचा ४१वा दिवस

कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज ४१ वा दिवस आहे. दिल्लीच्या सीमांवर प्रमुख ४० शेतकरी संघटनांसह, देशभरातील सुमारे ५०० शेतकरी संघटनांचे हजारो शेतकरी ठाण मांडून आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आलेल्या थंडीच्या लाटेमध्येही हे शेतकरी सीमांवरतीच बसून आहेत. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, आणि एमएसपी लागू करावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी ही आंदोलने सुरू आहेत.

big news and events of 5 january
शेतकरी आंदोलनाचा ४१वा दिवस

पंतप्रधान मोदी करणार कोची-बंगळुरू गॅस पाइपलाइनचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोची-बंगळुरू नैसर्गिक गॅस पाइपलाइन देशाला समर्पित करतील. 'एक देश, एक गॅस ग्रीड' साठी ही महत्त्वपूर्ण कामगिरी असेल. गेल (इंडिया) लिमिटेडने ४५०किमी लांबीची पाइपलाइन तयार केली आहे.

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट सुनावणी

मालेगाव बॉम्बस्फोटासंदर्भात गेल्या १२ वर्षांपासून विशेष न्यायालयामध्ये खटला प्रलंबित असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या संदर्भात ३ डिसेंबर २०२०पासून नियमित सुनावणी सुरू आहे. त्याची दुसरी सुनावणी १९ डिसेंबरला विशेष एनआयए न्यायालयात घेण्यात आली होती. मात्र, सुनावणीवेळी आरोपी गैरहजर राहिल्याने विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना ४ जानेवरीला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र ही सुनावणी आज होणार आहे.

big news and events of 5 january
मालेगाव 2008 बॉम्बस्फोट सुनावणी -

मुंबईतील नाईट कर्फ्यू हटवणार

मुंबईसह राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने महापालिकेच्या हद्दीत रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईमधील नाईट कर्फ्यु हटवण्यात यावा असा प्रस्ताव मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला असून आज हा कर्फ्यू हटवण्याची घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

big news and events of 5 january
मुंबईतील नाईट कर्फ्यू हटवणार

मुंबईत आजपासून पाणीकपात

येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉइंट दुरुस्ती कामामुळे आज ५ जानेवारीला सकाळी १० ते दिनांक ६ जानेवारी पर्यंत सकाळी १० दरम्यान २४ तासांसाठी मुंबईत १५ टक्के पाणीकपात असणार आहे. याबद्दल माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून देण्यात आली आहे.

big news and events of 5 january
मुंबईत आजपासून पाणीकपात

वर्षा राऊत आज ईडीसमोर हजर राहणार

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी ईडीकडे चौकशीसाठी हजर होण्यासाठी अधिक वेळ मागितला होता. आज ५ जानेवारीला वर्षा राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

big news and events of 5 january
वर्षा राऊत आज ईडीसमोर हजर राहणार

MPSC ची महत्वपूर्ण घोषणा

MPSC 2020 परीक्षा मध्ये SEBC विद्यार्थ्याना EWS प्रवर्ग बदलण्याची संधी आहे. आजपासून म्हणजे ते ५ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान लिंक खुली असणार आहे.

big news and events of 5 january
MPSC ची महत्वपूर्ण घोषणा

सोलापूर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन

आज सोलापूर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह जवळपास साडेपाच हजार धावपटूंचा सहभागी होणार आहेत. तर साडेतीन किलोमीटरच्या 'फन रन'मधून 'स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर'चा नारा देण्यात येणार आहे.

big news and events of 5 january
सोलापूर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन

केरळमध्ये आजपासून सिनेमागृह उघडणार

कोरोनाच्या नियमांचे पालन करून आजपासून केरळमध्ये सिनेमागृह सुरू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी ही माहिती दिली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर संक्रमण टाळण्यासाठी मार्च २०२० मध्ये सिनेमागृह बंद करण्यात आले होते.

big news and events of 5 january
केरळमध्ये आजपासून सिनेमागृह उघडणार -

भारतीय पुरुष हॉकी संघाचे शिबिर

कर्णधार मनप्रीत सिंग आणि गोलरक्षक पीआर श्रीजेश यांच्यासह भारतीय पुरुष हॉकीचे ३३ खेळाडू आजपासून बंगळुरू येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय शिबिरात परतणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.