नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्यानंतर काहीच दिवसात, वादग्रस्त इस्लामिक उपदेशक झाकीर नाईक याला भारतात परत नेण्याबाबत भारत आग्रह नाही, असा दावा मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महातीर मोहम्मद यांनी केला आहे. एका रेडीओला मुलाखतीत 'झाकीर नाईक याला मायदेशात परत पाठवण्याचा प्रस्ताव आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
“बहुतेक देशांना नाईक नको आहे. मी मोदींना याबाबत विचारना केली होती. मात्र, भारत त्याला परत नेण्यास आग्रही नाही. हा माणूस भारतासाठीही त्रासदायक ठरू शकतो ”असे उत्तर डॉ. मोहम्मद यांनी दिले आहे. मोदी आणि मोहम्मद यांच्यात झालेल्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती देताना परराष्ट्र सचिव विजय गोखले म्हणाले होते की, “झाकीर नाईकचा मुद्दा पंतप्रधानांनी चर्चेत उपस्थित केला होता. जाकीर नाईकचा प्रश्न महत्त्वाचा मुद्दा आहे. दोन्ही बाजूंनी अधिकारी या संदर्भात संपर्क साधतील यावर एकमत झाले आहे”
हेही वाचा - पंतप्रधान मोदी, शी जिनपिंग भेटीवर कलम 370चे सावट
दरम्यान, मोहम्मद यांचे वक्तव्य नाईकला तिसर्या देशात हद्दपार करण्याची शक्यता दर्शवते. “आम्ही त्याला हद्दपार करण्यासाठी ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. पण, या क्षणी कोणतेही ठीकाण निश्चित झालेले नाही” असेही डॉ. मोहम्मद यांनी सांगितले आहे. 2016 मध्ये ढाका येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीर अब्दुल करीम नाईक भारत सोडून पळून गेला होता. या हल्ल्यातील आत्मघातकी हल्लेखोर नाईकच्या युट्यूबवरील प्रवचनाने प्रेरित झालेला होता.
हेही वाचा - चिनी ड्रॅगनला गुंतवून ठेवण्यासाठी भारत प्रयत्नशील
एनआयए (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) आणि ईडी (एन्फोर्समेंट डायरेक्टरेट) कडून अनेक प्रकरणांमध्ये नाईक याच्याविरूद्ध तपास केला जात आहेत. त्याच्यावर तरुणांना दहशतवाद आणि आर्थिक गैरव्यवहारासाठी उद्युक्त करणे, चिथावणीखोर भाषण करणे, असे अनेक आरोप आहेत. मात्र, त्याने हे सर्व आरोप फेटाळून लावून मलेशियात आश्रय घेतला आहे. “तो या देशाचा नागरीक नाही. त्याला मागील सरकारने कायमस्वरूपी रहीवाशाचा दर्जा दिला आहे. त्याला या देशाच्या यंत्रणेवर किंवा राजकारणावर भाष्य करण्याचा अधिकार नाही. त्याने या नियमाचा भंग केला आहे. म्हणून आता त्याला बोलण्याची परवानगी नाही" असे डॉ. मोहम्मद यांनी या मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - पंतप्रधान मोदी, शी जिनपिंग भेटीवर कलम 370चे सावट
डॉ. मोहम्मद यांनी हेही स्पष्ट केले की नाईकची द्वेषयुक्त भाषणे ही मलेशियामध्ये जातीय फूट पाडण्यासाठी पुरक ठरू शकतात. ते म्हणाले, "त्याच्याविरूद्ध कोणतीही कारवाई करणे म्हणजे त्याच्या गटाविरूद्ध जाणे आहे. मलेशियामध्ये आपण कसे वागतो याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. समस्या आढळली म्हणजे ती उचलून बाहेर फेकून देण्याईतके ते सोपे नाही. अशा प्रकारच्या गोष्टी केल्यास ते देशासाठी अधिक त्रासदायक ठरू शकते. मलेशियन पंतप्रधानांच्या या वादग्रस्त वक्तव्याला परराष्ट्रमंत्र्यांनी नाकारले आहे. तसेच, भारत नाईकच्या प्रत्यार्पणासंदर्भात सक्तीने पुढे जात असल्याचेही अधोरेखित केले आहे.