चंदीगड- कोरोनाचे संकट बघता केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, काही लोक विनाकारण बाहेर फिरताना दिसून येत आहे. अशा लोकांनी लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहन माजी क्रिकेटर युवराज सिंह यांचे वडील व अभिनेता योगराज सिंग यांनी केले आहे.
कोरोना काही मोठी बीमारी नाही. त्याला घाबरण्याची गरज नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्याला घरी रहायला सांगितले आहे. आपण या सर्वांचे ऐकायला हवे. घरी राहूनच आपण कोरोना विषाणूला हरवू शकतो, असे योगराज सिंह यांनी सांगितले. त्याचबरोबर, 'वक्त विचारे सो बंदा होए' या गुरबाणीतील ओळीचा त्यांनी उल्लेख केला. जो व्यक्ती परिस्थितीला समजतो, तोच खरा व्यक्ती आहे, असा या ओळीचा अर्थ असून लोकांनी परिस्थिती समजून घरीच राहिले पाहिजे. तसेच आवश्यक ती संपूर्ण खबरदारी बाळगली पाहिजे, तेव्हाच आपण कोरोनापासून स्वत:चे रक्षण करू शकतो, असे योगराज सिंह यांनी सांगितले.
हेही वाचा- कोरोना आणिबाणी हाताळण्यासाठी केंद्र सरकारने 15 हजार कोटी केले मंजूर