हैदराबाद - तरुणाने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ चित्रित केला, त्यानंतर नदीत उडी घेऊन जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. पवन असे त्या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पवनने चित्रित केलेला व्हिडिओ व्हॉट्सअॅपचा स्टेटस ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. पवनने चित्रदुर्ग जिल्ह्यातील नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.
पवन हसन जिल्ह्यातील राहणारा आहे. पवनने चित्रित केलेल्या व्हिडिओत त्याची काळजी घेणारे कोणीच नसल्याने तो नैराश्यात गेला. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याने चित्रित केलेला व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवल्याने त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सापडू शकला नाही. शुक्रवारी पोलिसांना त्याचा मृतदेह नदीत मिळून आल्यानंतर ही घटना उघड झाली. त्याने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पवनच्या मित्रांनी सांगितले. मात्र, त्याच्याविषयी अद्याप अधिक माहिती कळू शकली नाही. याबाबत चित्रदुर्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोद करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे