ETV Bharat / bharat

उमेदवारी अर्ज भरताना राजू शेट्टी सोबत योगेंद्र यादव; काय आहे संबंध? - Kolhapur Parliamentry Constituency

राजू शेट्टी यांच्या सोबत उमेदवारी अर्ज दाखल करताना योगेंद्र यादव उपस्थित होते. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. आपण यादव यांना नेहमी टीव्हीवर राजकीय विश्लेषण करताना पाहत असतो. मात्र, आज अचानक योगेंद्र यावद कोल्हापूरात कसे? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

राजु शेट्टी सोबत योगेंद्र यादव
author img

By

Published : Mar 29, 2019, 12:38 PM IST

Updated : Mar 29, 2019, 2:33 PM IST

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकांना फारच कमी कालावधी उरलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे नेते उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. कोल्हापूरमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. गुरूवारपासूनच नामांकनासाठी नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटेचे नेते राजू शेट्टी यांनी समर्थकांच्या मोठ्या गर्दीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या शक्तीप्रदर्शनात राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव उपस्थित असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

राजू शेट्टी यांच्या सोबत उमेदवारी अर्ज दाखल करताना योगेंद्र यादव उपस्थित होते. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. आपण यादव यांना नेहमी टीव्हीवर राजकीय विश्लेषण करताना पाहत असतो. मात्र, आज अचानक योगेंद्र यावद कोल्हापूरात कसे? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. दोघांची मैत्री ही आत्ताची नाही. ते तब्बल ६ वर्षांपासून एकमेकांसोबत काम करत आहेत.

राजू शेट्टी आणि योगेंद्र यादव यांची भेट दिल्ली येथे अण्णा आंदोलनाच्या वेळी झाली. दोघांचेही विचार शेतकऱ्यांच्या हिताचे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी दोघेही धाऊन जाणारे. दोघांचेही विचार एकच असल्यामुळे त्यांच्या भेटीचे रुपांतर घट्ट मैत्रीमध्ये झाले. तेव्हापासून दोघेही एकमेकांच्या आंदोलनात आवर्जून उपस्थित राहतात.

योगेंद्र यादव त्यावेळी आम आदमी पक्षासाठी काम करत होते. मात्र, २०१५मध्ये त्यांनी आपला रामराम ठोकला. त्यांनतर ज्येष्ठ वकिल प्रशांत भूषण यांच्यासोबत मिळून त्यांनी शेतकऱ्यांसाठी नव्या पक्षाची स्थापना करण्याचा विचार केला. तेथूनच स्वराज्य अभियान या पक्षाची स्थापना झाली. पक्ष स्थापनेपासून अनेक वेळा योगेंद्र यादव यांनी राजू शेट्टींची भेट घेतली आहे. शेतकऱ्यांसाठी कोणती धोरणे राबवावीत यावर त्यांनी सतत शेट्टींना मार्गदर्शन केले आहे.

अलिकडेच मध्यप्रदेश येथे गोळीबारात ५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यातून राजू शेट्टी आणि व्ही. एम. सिंह यांनी देशातील सर्व शेतकरी नेत्यांना एकत्र करण्याचा विचार केला होता. त्यासाठी त्यांनी दिल्लीमध्ये एक बैठक घेतली होती. बैठकीच्या आदल्याच दिवशी यादव यांनी शेट्टींची भेट घेतली आणि आपण आपल्या संघर्षामध्ये सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

तेव्हापासून दोघांची मैत्री आणखीनच घट्ट झाली आहे. त्याची परिणीती म्हणून गुरवारी योगेंद्र यादव राजू शेट्टींच्या नामांकणाच्या वेळी उपस्थित होते. त्यामुळे आता विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

Intro:कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काल आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आघाडीच्या नेत्यांसोबत अजून एक चेहरा पाहायला मिळाला तो म्हणजे किसान सभेचे नेते योगेंद्र यादव यांचा. कोल्हापुरातील अनेकांना त्यांच्या येण्याचं आश्चर्य वाटले की, योगेंद्र यादव इथे कसे? पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढत असलेल्या खासदार राजू शेट्टी आणि योगेंद्र यादव यांची गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या दृढ मैत्रीमुळे ते आज शेट्टींच्या रॅलीमध्ये पाहायला मिळाले. Body:नेहमी टीव्ही आणि बातम्यांमध्ये एकमेकांचे नाव ऐकत असलेल्या शेट्टी आणि यादव यांची सहा वर्षांपूर्वी दिल्ली मध्ये भेट झाली. निमित्त होतं जनलोकपाल कायद्याच्या मंजुरीसाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचे. या उपोषणादरम्यानच शेतकऱ्यांच्या विविध प्रशांसाठी लढणाऱ्या या दोन नेत्यांची पहिल्यांदाच भेट झाली. एकविचारी असल्याने यांच्या दोघांमध्ये चांगले संबंध निर्माण झाले. त्यावेळी सामाजिक आणि राजकीय विश्‍लेषक म्हणून ओळख असलेले योगेंद्र यादव आम आदमी पार्टी मध्ये राजकीय सल्लागार म्हणून काम पहायचे. पण, २०१५ मध्ये ते आप पक्षातून बाहेर पडले आणि प्रशांत भूषण यांच्यासोबत शेतकऱ्यांसाठी नव्या पक्षाची स्थापना करण्याचा विचार त्यांनी सुरू केला. त्यानुसार स्वराज्य अभियान या पक्षाची स्थापना केली. या पक्षाची स्थापना करण्यापासून आजपर्यंत अनेक वेळा स्वतः योगेंद्र यादव यांनी शेट्टी यांची भेट घेऊन शेतीबद्दलची धोरणे काय काय असावीत यासाठी सल्ले घेतले आहेत.
त्यानंतर मध्यप्रदेशमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारानंतर ५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून राजू शेट्टी आणि व्ही. एम सिंह यांनी देशातील सर्वच शेतकरी नेत्यांना एकत्र आणण्याचा विचार केला. आणि दिल्लीमध्ये एक बैठक आयोजित केली. त्या बैठकीच्या आदल्या दिवशीच यादव यांनी शेट्टी यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी जाऊन मी सुद्धा आपल्या सोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी मिळून अनेक शेतकरी नेत्यांना एकत्र घेऊन सरकार विरोधात एक वज्रमूठ बांधत सत्ताधारी भाजपविरुद्ध रणशिंग फुंकण्याची रणनिती अाखली. दुश्मन का दुश्मन दोस्त म्हणतात त्याप्रमाणे आणि दोघेही सरकारविरोधात काम करत असल्याने दोघांमध्ये अधिकच जिव्हाळ्याचे नाते तयार झाले. हे नाते आता यादव एव्हडे जपत आहेत की शेट्टींचे कुठेही आंदोलन असो, ऊस परिषद असो त्यामध्ये ते सक्रियपणे सहभागी होतात. काल सुद्धा ते दिल्लीहून खास शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले. आणि शेट्टींच्या रॅलीमध्येही सहभागी झाले. यावेळी दोघांमधील असेलेल्या जिव्हाळ्याच्या मैत्रीच्या नात्याचे सर्वांना दर्शन झाले.

(काल शेट्टींच्या रॅलीच्या vis file आणि 1 to 1 केला आहे त्याचा use करा जर पॅकेज केले तर)Conclusion:.
Last Updated : Mar 29, 2019, 2:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.