ETV Bharat / bharat

जागतिक पर्यावरण दिन: थोडं थांबा...अन् जैवविविधतेकडं लक्ष द्या

अनेक वर्षांपासून निसर्गाचा शांतपणे ऱ्हास होत आहे. जेव्हा आपण जैवविविधतेचा नाश करतो, तेव्हा मानवाचाही नाश होतो, हे कोरोना संकटातून एव्हाना दिसून आले आहे.

जागतिक पर्यावरण दिन
जागतिक पर्यावरण दिन
author img

By

Published : Jun 5, 2020, 6:00 AM IST

हैदराबाद - संयुक्त राष्ट्राद्वारे पर्यावरणाचे संरक्षण आणि जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 5 जून रोजी जगातिक स्तरावर पर्यावरण दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा उपक्रम 100 पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जातो. हा दिवस लोकांपर्यत पोहोचण्यासाठी खूप प्रभावीही ठरत आहे.

1974 पासून प्रत्येक वर्षी 5 जूनला होतो साजरा

सरकार, उद्योगधंदे, सेलिब्रेटी आणि नागरिकांपर्यंत पर्यावरणाचा संदेश घेऊन पोहोचण्यासाठी त्यांचा जास्तीत जास्त सहभाग मिळवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी पर्यावरण संरक्षण येणारे विषयांवरही चर्चा होते. यावर्षी पर्यावरण दिवसाची थीम आहे 'जैवविविधता'. या वर्षीचा पर्यावरण दिनाचा उत्सव कोलंबिया आणि जर्मनी या देशांकडे देण्यात आला आहे. मात्र, या वर्षी सर्वसामान्यपणे कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.

निसर्गाचे 'समझो इशारे'

यावर्षी ब्राझील, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात जंगलांना लागलेल्या आगी, टोळधाडीच्या घटना, जागतिक कोरोनाचा फैलावातून निसर्ग आणि पर्यावरणातील नाते दिसून आले. जे अन्न आपण खातो, हवा आपण श्वाच्छोश्वासासाठी घेतो, जे पाणी आपण पितो, निसर्गाच्या या अधिवासात आपण राहतो, ते सगळं आपण ग्राह्य धरुन चालत आहोत.

अनेक वर्षांपासून निसर्गाचा शांतपणे ऱ्हास होत आहे. जेव्हा आपण जैवविविधतेचा नाश करतो, तेव्हा मानवाचाही नाश होतो, हे कोरोना संकटातून एव्हाना दिसून आले आहे. माणसाला होणाऱ्या आजारांपैकी 75 टक्के आजार हे प्राण्यांपासून माणसामध्ये येतात. कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे पर्यावरण परत पूर्वपदावर येत असल्याचेही पाहायला मिळत आहे. मानवाच्या अनुपस्थितीत निसर्गानेही मोकळा श्वास घेतला. इतर गोष्टींसारखे निसर्गालाही थोडा मोकळा शांत वेळ हवा असतो.

निसर्ग अनेक मार्गांनी आपल्याशी संवाद साधत असतो. फक्त आपण त्यांचे निरिक्षण करायला हवे. निसर्गावर कमी ताण टाकण्यासाठी आपण सर्वांनी साक्षर झालं पाहिजे आणि इतरांनाही साक्षर केले पाहिजे. आपल्या जीवनशैलीत बदल करायला पाहिजे. तरच निसर्गावरील बोजा कमी होईल. निसर्ग आपल्याला संदेश पाठवत आहेच. आपल्या अस्तित्वासाठी आपण त्याचं ऐकलंच पाहिजे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.