ETV Bharat / bharat

जागतिक हत्ती दिन विशेष; हत्तींबाबतच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

author img

By

Published : Aug 12, 2019, 7:00 AM IST

जगभरात हत्तीकडे एक प्राणी म्हणून पाहिले जाते. मात्र, भारतीय लोकांच्या मनात हत्तीसाठी आदराचे स्थान आहे. महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणून गणपतीला मान दिला जातो. गणेशोत्सव १५ दिवसांवर येऊन ठेपला असल्याने सर्वत्र गणेशाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. गणपतीला पाहिले की सर्वांनाच एका प्राण्याची आठवण नक्कीच येते, तो प्राणी म्हणजे हत्ती. आज जगभरात 'जागतिक हत्ती दिन' साजरा होत आहे. हत्तींविषयी माहिती सांगणारी ही विशेष स्टोरी...

जागतिक हत्ती दिन विशेष

जागतिक हत्ती दिन
जगभरात हत्तीकडे एक प्राणी म्हणून पाहिले जाते. मात्र, भारतीय लोकांच्या मनात हत्तीसाठी आदराचे स्थान आहे. महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणून गणपतीला मान दिला जातो. गणेशोत्सव १५ दिवसांवर येऊन ठेपला असल्याने सर्वत्र गणेशाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. गणपतीला पाहिले की सर्वांनाच एका प्राण्याची आठवण नक्कीच येते, तो प्राणी म्हणजे हत्ती.

जागतिक हत्ती दिन विशेष
हत्तीबाबत प्रत्येकाच्या मनात वेगवेगळी प्रतिमा असते. कुणाच्या मनात भीती निर्माण होते, तर कुणाच्या मनात आदर आणि कुतुहल. हत्ती हा प्राणी आहेच असा, अवाढव्य शरीर, कर्ण कर्कश आवाज, संथ परंतु डौलदार चाल. अशा या हत्तींच्या संवर्धन आणि संगोपनाबाबत सामान्य लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी १२ ऑगस्ट हा दिवस संपुर्ण जगभरात 'जागतिक हत्ती दिन' म्हणून साजरा केला जातो.

कधी पासून सुरू झाला 'जागतिक हत्ती दिन'?
कॅनडियन चित्रपट निर्माती पॅट्रिका सिम्स आणि थायलंड येथील 'एलिफंट रिइंट्रडक्शन फौंडेशन' यांच्या संयुक्त प्रयत्नांतून जागतिक हत्ती दिनाची सुरूवात झाली. २०१२ पासून जगभरात १२ ऑगस्ट हा दिवस हत्ती दिन म्हणून साजरा करतात.
भारतामध्ये २०१६ पासून हत्ती दिन साजरा करण्यास सुरूवात झाली. तत्कालीन पर्यावरण व वन राज्यमंत्री, श्री. अनिल माधव दवे यांनी अधिकृतपणे याची घोषणा केली होती. 'हत्तींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी भारत प्रयत्नशील राहील', अशी ग्वाही त्यांनी दिली होती.

हत्तींचे प्रकार-
जगभरातील हत्तींचे साधारण पाच प्रकारांत वर्गीकरण केले जाते. त्यांच्या निवास स्थानांचा आधार घेऊन हे वर्गीकरण केले गेले आहे.
१) आफ्रिकन हत्ती - सध्या पृथ्वीवर अस्तित्वात असलेला सर्वांत महाकाय जीव म्हणजे हा आफ्रिकन हत्ती. आफ्रिका खंडातील गवताळ प्रदेशामध्ये या हत्तींचा वावर आहे.
२) आशियन हत्ती - आशियन हत्ती भारतीय उपखंड आणि आग्नेय आशियामध्ये आढळतात. यांचे तीन उपप्रकार पडतात.
३) श्रीलंकन हत्ती - श्रीलंकेतील जंगलांमध्ये या हत्तींचा अधिवास आहे. हा आशियन हत्तींचा उपप्रकार आहे. साधारण २००० ते ५००० किलो पर्यंत यांचे वजन असते.
४) भारतीय हत्ती - ही हत्तींची स्थानिक प्रजाती आहे. भारतीय हत्ती हे श्रीलंकन हत्तींपेक्षा जास्त गडद रंगाचे असतात. भारतामध्ये निलगीरी पर्वतरांगांमध्ये हत्तींचा मुक्त वावर आहे.

आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशामध्ये आढळणारा हत्ती

हत्ती संवर्धनासाठी भारत प्रयत्नशील -
भारतामध्ये हत्तीला देवाची उपमा दिली जाते. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये हत्तींची पुजा केली जाते. मात्र असे असुनही भारतातील हत्तींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. भारत सरकारच्या २०१७च्या अहवालानुसार, २३ राज्यांमध्ये २७ हजार ३१२ हत्ती शिल्लक आहेत. हाच आकडा २००७ मध्ये ३० हजारांपेक्षा जास्त होती. हस्तीदंतासाठी हत्तींच्या शिकारीचे प्रमाण वाढल्याने हत्तींची प्रजाती धोक्यात आहे.
१) 'प्रोजेक्ट एलिफंट' हा प्रकल्प केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली चालवला जातो.
२) हत्तींचे अधिवास असलेली ठिकाणे संरक्षित करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून, हत्तींची शिकार आणि तस्करी विरोधात शिक्षेची तरतूद असलेले कायदे बनवले गेला आहेत.
३) संपुर्ण देशभरात हत्तींसाठी २८ ठिकाणे राखीव क्षेत्र म्हणून सरकारने घोषित केली आहेत.
४) पर्यावरण मंत्रालयाकडून 'एलिफंट टास्क फोर्स'ची निर्मिती करण्यात आली आहे.

तस्करांच्या हल्ल्यात मृत झालेला भारतीय हत्ती

हत्तींबाबतच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
1) हत्ती हा जगातील सर्वांत हुशार प्राण्यांपैकी एक प्राणी आहे. हत्तींची स्मरणशक्ती तीव्र असते.
२) हत्तींना उडी मारता येत नाही, पण ते पाण्यात पोहू शकतात.
३) पृथ्वीवरील सस्तन प्राण्यांमध्ये मादी हत्तींचा गरोदर असण्याचा कालावधी सर्वांत जास्त म्हणजे २२ महिने इतका असतो.
४) मानवी कानांना ऐकू न येणारे आवाज हत्ती काढू शकतात.
५) एकमेकांपासून हजारो किलो मीटर दूर असूनही दोन हत्ती एकमेकांच्या संपर्कात राहू शकतात.
६) हत्ती दिवसातील २४ तासांपैकी १२ ते १८ तास खाऊ शकतात.
७) हत्ती स्वत:चे आरशातील प्रतिबिंब ओळखू शकतात.
८) हत्ती १०० चेहरे लक्षात ठेऊ शकतात.

Intro:Body:

world elephant day

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.