ओसाका - आजपासून जपानमधील ओसाका या ठिकाणी ब्रिक्स देशाची जी २० परिषद सुरू झाली आहे. या परिषदेत ब्रिक्स देशांचा सहभाग आहे. या परिषदेमध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वांत मोठा धोका असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि शिन्जो आबे यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी ब्रिक्स देशांच्या प्रमुखांशी भेटले आहेत. यामध्ये चीनचे अध्यक्ष, रशिया, दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. या परिषदेत बोलताना दहशतवाद हा माणुसकीचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
आंतकवाद हा फक्त निष्पापांचे बळीच घेत नाही तर त्यामुळे विकासाच्या गतीवर आणि सामाजिक समानतेवरही फरक पडतो. त्यामुळे आंतकवाद आणि जातीयवादाला समर्थन न करता ते रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जपानमधील ओसाका या ठिकाणी ब्रिक्स देशाची जी २० परिषद सुरू झाली आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 परिषदेमध्ये सहभाग घेण्यासाठी ओसाका येथे आहेत. या परिषदेत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प, शिन्जो आबे यांची भेट घेतली आहे.