ETV Bharat / bharat

हॉकीची 'राणी' : ही आहे भारताची 'सुवर्णकन्या' राणी रामपाल

4 डिसेंबर 1994 ला शाहाबादेतील मारकंडा येथे राणीचा जन्म झाला. राममूर्ती आणि रामपाल अशी तिच्या आई-वडिलांचे नाव आहे. रामपाल घोडागाडी चालवून कुटुंब चालवत असत. चौथीत असताना राणीने पहिल्यांदा हॉकी स्टिक हातात पकडली. तिचा १३ व्या वर्षीच भारतीय महिला हॉकी टीममध्ये घेण्यात आले.

author img

By

Published : Mar 4, 2020, 12:14 PM IST

Updated : Mar 5, 2020, 8:01 PM IST

कुरुक्षेत्र - हरियाणाच्या कुरुक्षेत्रातील शाहाबाद या छोट्या गावातून आलेल्या राणी रामपाल हिने भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. तिला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर तिच्या वडिलांना आकाश ठेंगणं झालं. तिला 'वर्ल्ड गेम्स अ‌ॅथलीट ऑफ द ईयर' हा पुरस्कारही मिळाली आहे.

4 डिसेंबर 1994 ला शाहाबादेतील मारकंडा येथे राणीचा जन्म झाला. राममूर्ती आणि रामपाल अशी तिच्या आई-वडिलांचे नाव आहे. रामपाल घोडागाडी चालवून कुटुंब चालवत असत. चौथीत असताना राणीने पहिल्यांदा हॉकी स्टिक हातात पकडली. तिचा १३ व्या वर्षीच भारतीय महिला हॉकी टीममध्ये घेण्यात आले.

हॉकीची 'राणी' : ही आहे भारताची 'सुवर्णकन्या' राणी रामपाल

राणी बनली हॉकी टीमची कॅप्टन

हळ-हळू राणीचे चांगले नाव झाले. तिला हॉकीचे कप्तानपदही मिळाले. ती जसजशी खेळात पुढे जाऊ लागली, तसतशी तिच्या कुटुंबाची स्थिती सुधारू लागली. राणीने शाहाबादसारख्या छोट्या गावातून येऊन हरियाणा आणि देशाचे नाव उज्ज्वल केले. राणी तिच्या घरात सर्वांत लहान आहे. तिला दोन मोठे भाऊ आहेत. त्यापैकी एकजण रेल्वेत कार्यरत आहे. तर, दुसरा मेहनत-मजुरी करून घर चालवतो.

पद्मश्री पुरस्कार -

राणीला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर तिच्या वडिलांना खूप आनंद झाला. मोठ्या कष्टातून त्यांनी त्यांच्या मुलीला इथपर्यंत येण्यात मदत केली आहे. राणीने स्वच्छेने आपल्या नावापुढे केवळ वडिलांचे नाव लावले आहे. ती 'राणी रामपाल' एवढेच स्वतःचे नाव लावते.

एक नजर राणी रामपालच्या करिअरवर -

  • राणीला 2013 मध्ये ज्युनियर हॉकी विश्वकरंडकात 'प्लेयर ऑफ दि टूर्नामेंट'चा किताब मिळला.
  • राणी 2010 मध्ये हॉकी विश्व करंडकात खेळणारी सर्वांत कमी वयाची खेळाडू बनली. तेव्हा तिचे वय केवळ 15 वर्षे होते.
  • तिने 14 व्या वर्षी तिचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
  • तिने 2009 मध्ये आशिया करंडकादरम्यान भारतला रजत पदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.
  • राणी 2010 च्या राष्ट्रमंडल खेल आणि 2010 च्या आशिया करंडक स्पर्धेमध्ये भारतीय संघात होती.
  • तिला सर्वोत्कृष्ट लहान वयाच्या फॉरवर्ड खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.
  • 2013 मध्ये भारताच्या ज्यूनियर महिला हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले. हे भारताला तब्बल ३८ वर्षांनी विश्व करंडक हॉकी स्पर्धेत मिळालेले पदक होते.
  • राणी अशाच प्रकारे हॉकीची राणी बनून राहो. तिच्या चेहऱ्यावर हास्य राहो आणि तिच्या यशामुळे तिरंगा जगभरात डौलाने फडकत राहो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आणि राणीला पुढील काळात आणखी यश मिळावे, यासाठी ईटीव्ही भारततर्फे अनेक शुभेच्छा.

Last Updated : Mar 5, 2020, 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.