बंगळुरू - कर्नाटकच्या राजधानीत 'काश्मीर मुक्ती'चा फलक घेऊन उभारलेल्या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. बंगळुरूच्या टाऊन हॉलसमोर ही तरुणी हातात फलक घेऊन उभी होती.
गुरुवारी कर्नाटकातील एका सीएए विरोधी कार्यक्रमात एका तरुणीने 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या होत्या. अमूल्या असे नाव असलेल्या या तरुणीविरोधात हिंदू जागरण वेदिके ही संस्था टाऊन हॉलमध्ये निदर्शने करत होती. यावेळी आंदोलकांमध्ये काश्मीर मुक्तीचा फलक घेतलेली एक तरुणीही सहभागी होती, अशी माहिती बंगळुरू पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी दिली.
या फलकावर कन्नड भाषेमध्ये 'दलित मुक्ती', 'काश्मीर मुक्ती', आणि 'मुस्लीम मुक्ती' असे शब्द लिहिले होते. या महिलेला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे राव यांनी सांगितले.
हेही वाचा : पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणाऱ्या 'त्या' तरुणीला जामीन नाकारला; १४ दिवसांची कोठडी