ETV Bharat / bharat

जमावाची महिलेला झाडाला बांधून निर्दयीपणे मारहाण - mob lynching news

महिला मुले पळवणाऱ्या टोळीतील असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी तिला झाडाला बांधून निर्दयीपणे मारहाण केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात मुले पळवण्याच्या प्रकारात या महिलेचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.

महिलेला झाडाला बांधून निर्दयीपणे मारहाण
author img

By

Published : Aug 11, 2019, 5:27 PM IST

गोंडा (उत्तर प्रदेश) - एका महिलेला मुले पळवण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी झाडाला बांधून तिला निर्दयीपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवाबागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहेली गावात ही घटना शनिवारी घडली.

ही महिला मुले पळवणाऱ्या टोळीतील असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी तिला झाडाला बांधून निर्दयीपणे मारहाण केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात मुले पळवण्याच्या प्रकारात या महिलेचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.

आम्हाला या घटनेची शनिवारी सायंकाळी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन तपास केला. संबंधित महिलेचा मुले पळवण्याच्या प्रकारात कोणताही संबंध नसल्याचे दिसत आहे. या महिलेला मारहाण करणाऱ्या ९ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे गोंडाचे उप पोलीस अधीक्षक महेंद्रकुमार यांनी सांगितले.

Intro:Body:

मुले पळवण्याच्या संशयावरून महिलेला झाडाला बांधून निर्दयीपणे मारहाण

गोंडा (उत्तर प्रदेश) - एका महिलेला मुले पळवण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी झाडाला बांधून तिला निर्दयीपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आला आहे. नवाबागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहेली गावात ही घटना शनिवारी घडली.

मुले पळवणारी ही महिला असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी महिलेला झाडाला बांधून निर्दयीपणे मारहाण केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात मुले पळवण्याच्या प्रकारात तिचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.

आम्हाला या घटनेची शनिवारी सायंकाळी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन तपास केला. संबंधित महिलेचा मुले पळवण्याच्या प्रकारात कोणताही संबंध नसल्याचे दिसत आहे. या महिलेला मारहाण करणाऱ्या ९ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे गोंडाचे उप पोलीस अधीक्षक महेंद्रकुमार यांनी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.