नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 49 हजार 881 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 80 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी याबाबत माहिती दिली.
यासोबतच, काल दिवसभरात एकूण 517 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 20 हजार 527 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 80 लाख 40 हजार 203 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 6 लाख 3 हजार 697 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 73 लाख 15 हजार 989 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
-
With 49,881 new #COVID19 infections, India's total cases surge to 80,40,203. With 517 new deaths, toll mounts to 1,20,527 .
— ANI (@ANI) October 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Total active cases are 6,03,687 after a decrease of 7116 in last 24 hrs
Total cured cases are 73,15,989 with 56,480 new discharges in last 24 hrs. pic.twitter.com/tjnby8bRuy
">With 49,881 new #COVID19 infections, India's total cases surge to 80,40,203. With 517 new deaths, toll mounts to 1,20,527 .
— ANI (@ANI) October 29, 2020
Total active cases are 6,03,687 after a decrease of 7116 in last 24 hrs
Total cured cases are 73,15,989 with 56,480 new discharges in last 24 hrs. pic.twitter.com/tjnby8bRuyWith 49,881 new #COVID19 infections, India's total cases surge to 80,40,203. With 517 new deaths, toll mounts to 1,20,527 .
— ANI (@ANI) October 29, 2020
Total active cases are 6,03,687 after a decrease of 7116 in last 24 hrs
Total cured cases are 73,15,989 with 56,480 new discharges in last 24 hrs. pic.twitter.com/tjnby8bRuy
तसेच, काल दिवसभरात 10 लाख 75 हजार 760 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 10 कोटी, 65 लाख, 63 हजार, 440 एवढी झाली आहे.