नवी दिल्ली -जम्मू काश्मीरसाठी वेगळ्या 'थिएटर कमांड'ची स्थापना करण्याचा निर्णय वैचारिक पातळीवर असून सविस्तर चर्चेनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी सांगितले. सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांनीही यासंबंधी वक्तव्य केले आहे.
'काश्मीरसाठी वेगळे थिएटर कमांड निर्माण करण्याची योजना विचाराधीन आहे. ज्यामध्ये आंतरराष्ट्र्रीय सीमेचा भागही समाविष्ट असेल, असे वक्तव्य बिपिन रावत यांनी केले होते. मात्र, कोणताही निर्णय घेण्यासाठी आधी त्यावर सविस्तर चर्चा केली जाईल, आणि नंतरच निर्णय घेतला जाईल, असे नरवणे म्हणाले. या योजनेला अंतिम रुप देण्यात आले नाही. यासाठी आधी रोडमॅप तयार करावा लागेल, असे ते म्हणाले.
काय आहे थिएटर कमांड ?
एखाद्या मोक्याच्या भूभागासाठी वेगळी सुरक्षा व्यवस्था करण्यात येते. त्यामध्ये तिन्ही सेना दलांचा समावेश असून तिघांमध्ये समन्वय ठेवण्यात येतो. रणनिती आखण्यासाठी त्यामुळे सोपे जाते. जम्मू काश्मीरची पाकिस्तानबरोबर सीमा असल्याने हा प्रदेश भारतासाठी अति संवेदनशील आहे. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख आणि तप्तर ठेण्यासाठी थेटर कमांड निर्माण करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.