नवी दिल्ली - काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रियंकांनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी, अशी त्यांना विनंती केली. यावर 'वाराणसीतून का नाही' (व्हाय नॉट वाराणसी?) असे प्रत्युत्तर प्रियंकांनी दिले. वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान मोदी निवडणूक लढवत आहेत.
प्रियंकांनी काल (गुरुवारी) रायबरेलीमध्ये पक्ष कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी प्रियंकांना रायबरेलीतून निवडणूक लढवण्याविषयी विचारले. यावर हसत प्रियंकांनी, वाराणसीतून का नाही? असा प्रतिप्रश्न कार्यकर्त्यांना केला. 'मी आईला सांगितले आहे की तू काळजी करू नकोस. मी तुझ्या मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे', असेही प्रियंकांनी यावेळी सांगितले. प्रियंकांकडे पूर्व उत्तर प्रदेशचा प्रभार सोपवण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रियंका उत्तर प्रदेश पिंजून काढत आहेत. प्रियंका सातत्याने उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत.
दरम्यान, पक्षाला वाटले तर आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे प्रियंकांनी नुकतेच सांगितले होते. यामुळे काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. 'पक्षाची इच्छा असेल, तर नक्की निवडणूक लढवेन. मात्र, याविषयी अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही,' असे त्यांनी सांगितले.
'वाराणसीतून का नाही'?; रायबरेलीतून निवडणूक लढवण्याच्या प्रश्नाला प्रियंकांचा प्रतिप्रश्न - Varanasi
'मी आईला सांगितले आहे की तू काळजी करू नकोस. मी तुझ्या मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे', असेही प्रियंकांनी यावेळी सांगितले. प्रियंकांकडे पूर्व उत्तर प्रदेशचा प्रभार सोपवण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रियंका उत्तर प्रदेश पिंजून काढत आहेत. प्रियंका सातत्याने उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत.
नवी दिल्ली - काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रियंकांनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी, अशी त्यांना विनंती केली. यावर 'वाराणसीतून का नाही' (व्हाय नॉट वाराणसी?) असे प्रत्युत्तर प्रियंकांनी दिले. वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान मोदी निवडणूक लढवत आहेत.
प्रियंकांनी काल (गुरुवारी) रायबरेलीमध्ये पक्ष कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी प्रियंकांना रायबरेलीतून निवडणूक लढवण्याविषयी विचारले. यावर हसत प्रियंकांनी, वाराणसीतून का नाही? असा प्रतिप्रश्न कार्यकर्त्यांना केला. 'मी आईला सांगितले आहे की तू काळजी करू नकोस. मी तुझ्या मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे', असेही प्रियंकांनी यावेळी सांगितले. प्रियंकांकडे पूर्व उत्तर प्रदेशचा प्रभार सोपवण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रियंका उत्तर प्रदेश पिंजून काढत आहेत. प्रियंका सातत्याने उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत.
दरम्यान, पक्षाला वाटले तर आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे प्रियंकांनी नुकतेच सांगितले होते. यामुळे काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. 'पक्षाची इच्छा असेल, तर नक्की निवडणूक लढवेन. मात्र, याविषयी अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही,' असे त्यांनी सांगितले.
'वाराणसीतून का नाही'?; रायबरेलीतून निवडणूक लढवण्याच्या प्रश्नाला प्रियंकांचा प्रतिप्रश्न

Conclusion: