नवी दिल्ली - व्हॉट्सअॅपवर भारतीय नागरिकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचे उल्लघंन केल्यासंबधी काही माहिती समोर आली होती. याबाबत आज व्हॉट्सअॅपने दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
इस्रायलच्या स्पायवेअर पिगाससने भारतामधील 17 भारतीयांची हेरगिरी केल्याप्रकरणी व्हॉट्सअॅपने केंद्र सरकारला लेखी उत्तर दिले आहे. पत्रामध्ये व्हॉट्सअॅपने ते सुरक्षा उपाययोजना करीत असल्याचे म्हटले आहे.
काय आहे व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरण?
इस्रायलच्या स्पायवेअर पिगासस भारतामध्ये सक्रिय होता. इस्राईलमधील एनएसओ ग्रुपने तंत्रज्ञानाचा वापर करत जगभरातील १ हजार ४०० लोकांच्या स्मार्टफोनला लक्ष्य केल्याचे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. यामध्ये राजकीय विरोधक, पत्रकार आणि सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये कोणत्या पत्रकार आणि कार्यकर्त्यांचा समावेश हे कंपनीने जाहीर केले नाही. व्हॉट्सअॅपचे जगभरात १.५ अब्ज वापरकर्ते आहेत. यामध्ये भारतामध्ये ४ कोटी वापरकर्ते आहेत.