ETV Bharat / bharat

यकृत डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय? - यकृत निरोगी कसे ठेवाल

यकृत सामान्यरित्या कार्य करत नसेल, यकृताचे काही आजार जास्त दिवसांपासून असतील तर त्यामुळे यकृत निकामी होऊ शकते. त्याची विविध कारणे असू शकतात. त्यापैकी एक तुमची जीवनशैली देखील आहे. आपल्या जीवनशैलीचा आपल्या यकृतावर हळुहळु परिणाम करते. यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी हा यकृताचा आजार होऊ शकतो, असे डॉ. संध्या पटेल सांगतात.

Liver
यकृत
author img

By

Published : Jul 17, 2020, 1:14 PM IST

यकृत आपल्या शरीराचा अविभाज्य अंग आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी शरीरात डिटॉक्सिफिकेशन आणि पित्त तयार होणे महत्वाचे आहे. तसेच विषारी पदार्थ निरंतर बाहेर न पडल्यास यकृताची हानी होऊ शकते.

याबद्दल प्रो. डॉ. संध्या पटेल, एमडी आयुर्वेद, हरिद्वार म्हणतात, कधीकधी डिटोक्सिफायरला डिटॉक्सिफिकेशनची गरज असते. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे यकृत रचनेची प्रक्रिया नीट करणे तसेच यकृतावर योग्य उपचार करून त्याला मुळ स्थितीत आणण्यासाठी उपचार करणे नियमीत कार्यसाठी सक्षम करणे.

यकृत सामान्यरित्या कार्य करत नसेल, यकृताचे काही आजार जास्त दिवसांपासून असतील तर त्यामुळे यकृत निकामी होऊ शकते. त्याची विविध कारणे असू शकतात. त्यापैकी एक तुमची जीवनशैली देखील आहे. आपल्या जीवनशैलीचा आपल्या यकृतावर हळुहळु परिणाम करते. यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी हा यकृताचा आजार होऊ शकतो, असे संध्या पटेल सांगतात.

डिटॉक्सिफिकेशनची गरज कोणाला आहे?

कोणाच्या यकृताचा डिटॉक्सिफिकेशनची गरज आहे, हे कसे कळणार, या प्रश्नाचे उत्तर देतांना डॉ. संध्या सांगतात -

  • जे लोक नियमित अति मद्य प्राशन करतात, त्यांना यकृत डिटॉक्सिफिकेशनची गजर भासू शकतात.
  • काही विशिष्ट शारीरिक आजार
  • सततचे आजारपण
  • अॅबनॉर्मल लिव्हर फंक्शन टेस्ट्स (एलएफटी)
  • कुटुंबात यकृतासंबंधी आजाराचा इतिहास असणे

डिटॉक्सिफाईंग -

  • यकृत निरोगी ठेवण्यासाठी काय प्रक्रिया करण्याची गरज आहे, यावर डॉ. संध्या सांगतात -
  • आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, “काळजी घेणे रोग बरा करण्यापेक्षा चांगले आहे”, म्हणूनच, सुरुवातीपासूनच निरोगी जीवनशैली अवलंबवणे गरजेचे आहे.
  • तुम्ही जर सदोष जीवनशैली जगत असाल, तर उशीर होण्याआधी लगेच त्यामध्ये बदल करा.
  • तुमचे यकृत निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये फळांचा समावेश करा. प्रमाणात प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा.
  • आहारात पुनर्नवाचा समावेश केल्यास ते यकृत शुद्ध करण्यास मदत करते. त्याचे सेवन करण्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

तुम्ही हे देखील करू शकता -

  • मद्य प्राशन करणे पूर्णतः थांबवणे किंवा प्रमाणात सेवन करणे.
  • स्वतःला हेपिटायसिस ए आणि बी ची लस द्या.
  • वजन नियंत्रित ठेवा आणि नियमित व्यायाम करा.
  • लैंगिक रोगांचा प्रसार टाळण्यासाठी सुरक्षित शारिरीक संबंध ठेवा.

खालील पदार्थांचे सेवन करू शकता -

  • लसूण
  • संत्री
  • हिरव्या पालेभाज्या
  • बीट
  • अक्रोड
  • ग्रीन टी
  • हळदीचा चहा
  • लिंबूपाणी

निरोगी जीवनशैली ही निरोगी यकृताची आणि निरोगी जीवनाची चावी आहे. आहारातील थोडे बदल आणि नियमित व्यायाम करून तुम्ही निरोगी राहू शकता. कोणत्याही गोष्टीसाठी खूप उशीर होण्याआधीच काळजी केलेली कधीही चांगली. त्यामुळे यकृताच्या आजारापासून बचावासाठी आतापासून काळजी घ्यायला सुरुवात करा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.