ETV Bharat / bharat

दिल्लीत तोंडाला मास्क लावणे अनिवार्य, अरविंद केजरीवाल - दिल्ली कोरोना बातमी

राजधानी दिल्लीमध्ये तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. दिल्लीत झालेल्या तबलिगी धार्मिक कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.

अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल
author img

By

Published : Apr 8, 2020, 9:12 PM IST

नवी दिल्ली - तोंडाला मास्क लावल्याने कोरोनाचा प्रसार थांबण्यास मोठी मदत होत आहे. त्यामुळे आता घराबाहेर निघताना मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. फक्त मास्क नाही तर कापड तोंडाला बांधले तरी चालेल, असेही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.

  • Wearing of facial masks can reduce the spread of #Coronavirus substantially. Therefore, it has been decided that facial masks will be compulsory for anyone stepping out of their house. Cloth mask shall be eligible too: Delhi CM Arvind Kejriwal. (File pic) pic.twitter.com/3TeoeU76wW

    — ANI (@ANI) April 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

त्यामुळे आता राजधानी दिल्लीमध्ये तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. दिल्लीत झालेल्या तबलिगी धार्मिक कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज आरोग्य अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्लीमध्ये 600 पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दक्षिण दिल्लीतील 2 परिसर सील करण्यात आले आहेत. या भागातील नागरिकांना सरकार घरी रेशन पोहचवणार आहेत. देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 हजार 274 झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.