ETV Bharat / bharat

सहाव्या दिवशीही पणजी तहानलेलीच; फुटलेली मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम युद्धपातळीवर - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजीसह तिसवाडी आणि फोंडा तालुक्यांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटून ६ दिवस उलटले तरीही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे पणजीवासीयांना पाण्यासाठी अजूनही टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.

जलवाहिनी
author img

By

Published : Aug 20, 2019, 10:25 PM IST

गोवा - पणजीसह तिसवाडी आणि फोंडा तालुक्यांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटून ६ दिवस उलटले तरीही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे पणजीवासीयांना पाण्यासाठी अजूनही टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.

सहाव्या दिवशीही पणजी तहानलेलीच

फोंडा तालुक्यातील खांडेपार येथून पणजीच्या दिशेने येणारी जलवाहिनी गुरूवारी (15) सकाळी पाचच्या दरम्यान फूटली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ दुरुस्तीच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यानूसार कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु, या जलवाहिनीच्या सभोवती असलेला मातीचा भराव मुसळधार पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे, त्यासाठी नव्याने सिमेंटचा पाया उभारावा लागला. पावसाने उघडीप दिल्याने काम करणे सुलभ झाले तरीही मंगळवार संध्याकाळपर्यंत ते आटोक्यात आले नव्हते. सोमवारी रात्री वेल्डिंगचे सुमारे 40 टक्के काम अपूर्ण होते. सदर कामाला मंगळवारी सकाळी सुरूवात करण्यात आली.

रवीवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तर, मंगळवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली असून बुधवारी संध्याकाळपर्यंत पणजी शहराला सुरळीत पाणीपुरवठा होईल असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मागील ६ दिवस पणजीवासी पाण्याच्या प्रतिक्षेत दिवस ढकलत आहेत. काही ठिकाणी सरकार पाण्याचा टँकर पुरवत आहे, तर काही ठिकाणी खाजगीरित्या पाण्याचे टँकर मागावले जात आहे. तर, जेथे शक्य आहे तेथे विहिरीचा आधार घेतला जात आहे. ६ दिवस उलटुनही पाणी पुरवठा होत नसल्याने सर्वच स्तरातून सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

Intro:पणजी : गोव्याची राजधानी पणजीसह तिसवाडी आणि फोंडा तालुक्यांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटून सहा दिवस उलटले तरीही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे पणजीवासीयांना पाण्यासाठी आजही टॅंकरचा आधार घ्यावा लागला. Body:फोंडा तालुक्यातील खांडेपार येथून पणजीच्या दिशेने येणारी ही जलवाहिनी गुरूवारी (दि. 15) सकाळी पाचच्या दरम्यान फूटली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ दूरुस्तीच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यानूसार कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु, या जलवाहिनीच्या सभोवती असलेला मातीचा भराव मुसळधार पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे त्यासाठी नव्याने सिमेंटचा पाया उभारावा लागला. पावसाने उघडीप दिल्याने काम करणे सूलभ झाले तरीही आज संध्याकाळपर्यंत आटोक्यात आले नव्हते. सोमवारी रात्री वेल्डिंगचे सुमारे 40 टक्के काम अपूर्ण होते. जयमाला आज सकाळी सुरूवात करण्यात आली.
रवीवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. तर आज सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली असून बुधवारी संध्याकाळपर्यंत पणजी शहराला सुरळीत पाणीपुरवठा होईल.
दरम्यान, मागील सहा दिवस पणजीवासीय पाण्याच्या प्रतीक्षेत दिवस ढकलत आहेत. काही ठिकाणी सरकार पाण्याचा टँकर पुरवत आहे. तर काही ठिकाणी खाजगीरित्या पाण्याचे टँकर मागावले जात आहे. तर जेथे शक्य आहे तेथे विहिरीचा आधार घेतला जात आहे.
सहा दिवस होऊनही पाणी पुरवठा होत नसल्याने सर्वच स्तरातून सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.