तमिळनाडू - कोइंबतूर या शहरातील एक हॉटेलमध्ये हत्ती घुसल्याची घटना घडली आहे. मात्र, खायला काही न मिळाल्याने तो परत गेला. हत्तीची हॉटेलमध्ये अन्न शोधतानाची घटना सिसिटिव्हीमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हॉटेलमधील कामगार आपले काम करत होते. त्यावेळी त्यांना हत्ती हॉटेलमध्ये येत असल्याचे पाहायला मिळाले. हत्तीला घाबरून कामगार बाजुला झाले. भुकेने व्याकुळ झालेला हत्ती हॉटेलमध्ये घुसला आणि अन्न शोधायला लागला. मात्र, त्याला तिथे काही न मिळाल्याने तो परतला.