अमरावती - आंध्र प्रदेशात विशाखा एक्सप्रेसचे इंजिन भुवनेश्वरहून सिकंदराबादकडे येताना डब्यांपासून वेगळे झाले. नरसीपट्टणम ते तुनी रेल्वे स्थानकांदरम्यान संध्याकाळी ही घटना घडली.
विजयवाडा स्थानकावरील सूत्रांनुसार, डबे आणि इंजिनदरम्यानचा सांधा निघाल्यामुळे ही घटना घडली. मात्र, असे होण्याचे कारण समजू शकलेले नाही. खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या प्रवाशांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी साखळी खेचून डबे थांबवले. त्यानंतर गाडीचे इंजिन बोगींशिवायच १० किलोमीटर धावले.