मुंबई - गेली चार वर्ष आम्ही भारतीय क्रिकेट संघाला 7 व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आणले, संघात दुफळी असती तर हे शक्य झाले असते का? त्यामुळे संघात वाद नाहीत. ऑल इज वेल! असे वक्तव्य भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने केले आहे. या परिषदेत कोहली वर्ल्ड कपनंतर सुरू झालेल्या रोहित शर्मासोबतच्या वादांच्या चर्चांवर काय मत व्यक्त करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
यावर बोलताना, मी पण खूप काही ऐकले आहे. परंतू, या बातम्या पेरल्या जात आहेत. याचा कोणाला फायदा होतोय हे मलाच कळत नाही. गेली चार वर्ष आम्ही संघाला 7 व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आणले, संघात दुफळी असती तर हे शक्य झाले असते का? अशा चर्चा येणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे; हे दुर्दैवी आहे, असे कोहली म्हणाला.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले होते. वर्ल्डकप-2019 मध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली. तसेच रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या. विषयावर विराट काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष होतं.
यावर बोलताना, वैयक्तिक आयुष्य आणि क्रिकेटची आम्ही गल्लत करत नाही, अशा बातम्या वेदना देतात. अशा चर्चा होत आहेत हेच खूप वाईट आहे. आम्ही जेव्हा चांगले खेळतो तेव्हा सगळे आमचे कौतुक करतात आणि आता हेच आता लोक अशा गोष्टी पसरवत आहेत. भारतीय संघाला टॉपवर पोहचवणे हे आमचे ध्येय आहे, असे सांगत विराटने या वादाला पूर्णविराम दिला.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ आज (दि.२८ जुलै) ला रवाना होणार आहे. दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये, ड्रेसिंग रुमचं वातावरणं कसं आहे हे तुम्ही स्वतः येऊ पाहा, असे बोलून त्याने आपल्या भावना मोकळ्या केल्या. कुलदीप यादव असो किंवा महेंद्रसिंग धोनी यांच्यासोबतचे संबंध किती खेळीमेळीचे आहेत, हे तुम्हीच बघा असे विराट बोलला.
3 ऑगस्टपासून दौऱ्यातील ट्वेंटी-20 सामन्यांना सुरुवात होईल. पहिले दोन सामने फ्लोरिडा येथे खेळवण्यात येणार असून, तर तिसरा सामना गयानात होणार आहे. यानंतर तीन वन-डे आणि दोन कसोटी सामनेही होणार आहेतपुढे माध्यमांशी बोलताना, वेस्ट इंडीजचा दौरा आमच्यासाठी महत्वाचा आहे. आम्ही सर्व फॉरमॅट मधील क्रिकेट खेळणार आहोत. या निमित्ताने कसोटी क्रिकेटला प्रतिष्ठा मिळणार आहे. आम्ही आत्मविश्वासाने स्पर्धेला सामोरे जात आहोत. संघ चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा विराटने व्यक्त केली.
कोणताही खेळाडू विश्वचषकाने थकलेला नसून, निवड समितीने योग्य निवड केली आहे. विश्वचषकाचा पराभव स्वीकारून नव्या खेळाडूंसह जिंकणार असल्याचे त्याने सांगितले.
प्रशिक्षकासंदर्भात विचारले असता, रवी शास्त्रीसोबत काम करण्याचा आनंद आहे. भविष्यातही सोबत राहयला आवडेल, असं कोहली म्हणाला.
रवी शास्त्रींनी माध्यमांशी बोलताना, लवकरच खेळाडूंच्या पत्नी बँटींग आणि बॉलिंग करत आहेत, अशाही बातम्या येतील,असा टोला लगावला.
टी-20साठी भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी
वन-डे साठी भारतीय संघ - विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी
कसोटीसाठी भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव