नवी दिल्ली - गेल्या 20 दिवसांपासून राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय सत्तासंघर्षात आता एका व्हायरल व्हिडिओमुळे नवे वादळ निर्माण झाले आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे नेते संभाषण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात विशेष म्हणजे, हे संभाषण राज्याच्या मुख्यमंत्र्याचे पूत्र वैभव गहलोत आणि विधानसभा अध्यक्ष डॉ. सी.पी. जोशी यांच्यात सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे.
वैभव गहलोत यांनी एक दिवसाआधी विधानसभा अध्यक्ष डॉ. जोशी यांची भेट घेतली होती. वैभव यांनी या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. आता या बैठकीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सरकारला वाचवण्यासाठीच्या नियोजनांची दोघांमध्ये चर्चा सुरू आहे.
दरम्यान, यापूर्वी सरकार पाडण्यासंबंधी संभाषण होत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या आधारे सरकारचे मुख्य गटनेता जोशी यांनी एसओजीला दोन तक्रारी दिल्या. त्याआधारे एसओजीने एफआयआर नोंदविला आहे.