जुनागढ -गुजरातमधील जुनागढच्या रस्त्यांवरून मनसोक्तपणे फिरणाऱ्या सिंहांचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. गिरनार वन्यप्राणी अभयारण्यातून फिरता-फिरता हे सिंह रस्त्यांवर येऊन पोहोचले आहेत. कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींचा घोळका फिरावा तसे हे सात सिंह रिमझिम पावसात रात्रीच्या वेळी रस्त्यावरून फेरफटका मारत आहेत. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
-
#WATCH Viral video of a pride of lions seen roaming around a city road in Junagadh, which is near Girnar Wildlife Sanctuary. #Gujarat pic.twitter.com/QnpNQrb5yX
— ANI (@ANI) September 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Viral video of a pride of lions seen roaming around a city road in Junagadh, which is near Girnar Wildlife Sanctuary. #Gujarat pic.twitter.com/QnpNQrb5yX
— ANI (@ANI) September 14, 2019#WATCH Viral video of a pride of lions seen roaming around a city road in Junagadh, which is near Girnar Wildlife Sanctuary. #Gujarat pic.twitter.com/QnpNQrb5yX
— ANI (@ANI) September 14, 2019
हा व्हिडिओ अनेकांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटसवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्यांना पाहून रस्त्यावरील काही कुत्री भुंकताना दिसत आहेत. मात्र, हे जंगलाचे राजे कशाचीही काळजी न करता निवांत फिरण्याचा आनंद घेत आहेत. जुनागढमधील भावनाथ परिसरातील भारती आश्रम येथून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
हेही वाचा - 'त्याच्या' देशसेवेला सलाम! लष्कराच्या श्वानाचा मृत्यू, जवानांकडून आदरांजली
अशा प्रकारे जंगलातील सिंह अनेकदा रस्त्यावर येत असल्याचे येथील स्थानिकांकडून ऐकायला मिळत आहे. रात्रभर आरामात फिरल्यानंतर हे सिंह स्वतःच जंगलात परत जात असल्याचेही सांगण्यात आले.
जुनागढ हे शहर गुजरातची आर्थिक राजधानी सौराष्ट्र येथून १०० किलोमीटर अंतरावर आहे. हा भाग गिरनार अभयारण्याच्या जवळ आहे. हे अभयारण्य आशियातील ४० हून अधिक सिंहांचे निवासस्थान आहे.
हेही वाचा - तुम्ही सीटबेल्ट लावलाय का? नागरिकांनी जाब विचारल्याने पोलिसांची घाबरगुंडी