ETV Bharat / bharat

प्रसिद्ध व्हायोलिन वादक टीएन कृष्णन यांचे निधन - टीएन कृष्णन निधन न्यूज

प्रसिद्ध व्हायोलिन वादक टीएन कृष्णन यांचे सोमवारी सायंकाळी चेन्नईमध्ये निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

violin-maestro-tn-krishnan-passed-away-in-chennai
प्रसिद्ध व्हायोलिन वादक टीएन कृष्णन यांचे निधन
author img

By

Published : Nov 3, 2020, 8:18 AM IST

Updated : Nov 3, 2020, 8:43 AM IST

चेन्नई - प्रसिद्ध व्हायोलिन वादक टीएन कृष्णन यांचे सोमवारी सायंकाळी चेन्नईमध्ये निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

टीएन कृष्णन यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९२८ साली केरळमध्ये झाला होता. त्याचे पूर्ण नाव त्रिपुनिथुरा नारायणायर कृष्णन असे होते. वडील ए नारायण अय्यर यांच्याकडून त्यांनी बालपणात संगीताचे धडे गिरवले. वयाच्या ११व्या वर्षी त्यांनी तिरुअनंतरपुरममध्ये पहिला कॉन्सर्ट केला. यानंतर ते अल्लप्पीच्या पार्थसारथीचे मेंटर बनले. १९४२ला ते चेन्नईला स्थायिक झाले. यादरम्यान, ते सेमंगुडी श्रीनिवास यांच्या संपर्कात आले. हाच कृष्णन यांच्या संगीत करियरमधील टर्निंग पॉईंट ठरला.

या दिग्गजासोबत कृष्णन यांनी केलं काम -

कृष्णन यांनी अरियाकुडी रामानुज अयंगर, मुसिरी सुब्रमनिया अय्यर, अलाथुर ब्रदर्स, जीएन बालासुब्रमण्यम, मदुरै मणी अय्यर, वैद्यनाथ भगवान, एमडी रामनाथन आणि महाराजपुरम विश्वनाथ अय्यर यासारख्या महान संगीतकारांसोबत काम केलं.

पद्म पुरस्काराने सन्मान -

कृष्णन यांनी एक शिक्षक म्हणून देखील आपले योगदान दिले. चेन्नईच्या म्यूझिक कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पहिले आहे. यानंतर ते दिल्ली विद्यापीठात स्कूल ऑफ म्यूझीक अ‌ॅन्ड फाइन ऑर्टसचे संचालक बनले. संगीत दुनियेत कृष्णन यांना प्राध्यापक म्हणून ओळखले जात होते. त्यांना संगीत अकादमीचा संगीत कलानिधी, पद्य पुरस्कार आणि पद्म भूषण पुरस्कारासह अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा - मध्यप्रदेश, गुजरातसह 10 राज्यातील विधानसभेच्या 54 जागांसाठी आज पोटनिवडणूक

हेही वाचा - 'सत्य बोलल्यामुळे तुरुंगात मृत्यू आला तरी चालेल, लढा शेवटपर्यंत लढणार'

Last Updated : Nov 3, 2020, 8:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.