ETV Bharat / bharat

'आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले मुळीच सहन केले जाणार नाही'

author img

By

Published : Jun 1, 2020, 3:37 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कर्नाटकमधील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले मुळीच सहन केले जाणार नाही, असे मोदी कार्यक्रमात म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कर्नाटकमधील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. डॉक्टर, परिचारिका आणि स्वच्छता कामगारांसोबत हिंसाचार, गैरवर्तन आणि असभ्य वर्तनाच्या घटना समोर येत आहेत. याप्रकारे कर्मचाऱ्यावर केले जाणारे हल्ले सहन केले जाणार नाहीत. जो कोणी यात दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मोदी म्हणाले.

कोरोना व्हायरस हा एक अदृश्य शत्रू आहे. जो दिसत नाही. मात्र, कोरोना वॉरियर्सची मेहनत दिसत आहे. आरोग्य कर्मचारी एखाद्या सैनिकासारखे काम करत असून देशासाठी कोरोनाविरोधात लढत आहेत. संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे असून भारताच्या डॉक्टरांकडे जगाच्या नजरा आहेत, असेही मोदी म्हणाले.

दुसर्‍या महायुद्धानंतर, आज सर्वात मोठं संकट आले आहे, जसं जागतिक युद्धानंतर जग बदललं. तसेच कोरोनापूर्वीचे आणि कोरोनानंतर जग बदललं आहे. आज जर जागतिक महामारी उद्भवली नसती, तर या विशेष दिवशी मी तुम्हा सर्वांसोबत बंगळुरुमध्ये सामील झालो असतो. डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी आणि वैज्ञानिक समुदायाकडे लोक आशा आणि कृतज्ञतेने पाहत आहेत, असे मोदी म्हणाले.

कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेवरही भाष्य केले. आयुष्यमान भारत योजनेमुळे विनाशुल्क उपचार करण्यात आले आहेत. या योजनेचा अनेकांना लाभ झाल्याचे मोदींनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.