हैदराबाद - प्रसिद्ध इतिहासकार व लेखक रामचंद्र गुहा यांच्यावर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी टीका केली आहे. गुहा यांनी एका ट्विटमध्ये गुजरात सांस्कृतिकदृष्ट्या मागास प्रांत असल्याचा उल्लेख केला होता. यापूर्वी ब्रिटिश भारतात फोडा आणि राज्य करा याचा वापर करत होते. सध्या काही अभिजन वर्ग तसा प्रयत्न करत आहे, असे प्रत्युत्तर रुपानी यांनी गुहा यांना दिले.
रामचंद्र गुहा यांनी फिलीप स्प्राट यांनी 1939 मध्ये लिहलेल्या लेखातील एक उतारा ट्विटरवर शेअर केला होता."गुजरात आर्थिकदृष्ट्या प्रगत आहे मात्र सांस्कृतिकदृष्ट्या मागास प्रांत आहे. याची तुलना बंगाल सोबत केल्यास बंगाल आर्थिकदृष्ट्या मागास आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत आहे" असे ट्विटमध्ये लिहिले होते.
गुजरात श्रेष्ठ आहे, बंगाल श्रेष्ठ आहे, भारत एकात्म आहे आपला सांस्कृतिक पाया भक्कम आहे. आपल्या आर्थिक प्रगतीच्या आकांक्षा देखील उच्च आहेत, असे विजय रूपाणी म्हणाले.
फिलीप स्प्राट हा हा ब्रिटिश लेखक होता. ब्रिटिश ऑफ द कम्युनिस्ट इंटरनॅशनल यांनी त्याला भारतात कम्युनिझमच्या प्रसारासाठी पाठवले होते. तो एम. एन. रॉय यांचा मित्र झाला होता.