अहमदाबाद - गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची काँग्रेसच्या तीन आमदारांसमवेत बैठक झाली होती. या बैठकीत सहभागी झालेल्या एका आमदाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे रुपाणी यांनी 'सेल्फ क्वारंटाइन' होण्याचा निर्णय घेतला आहे.
विजय रुपाणी पुढील सात दिवस कोणत्याही व्यक्तीला भेटणार नाहीत. यापुढील सर्व बैठका ते व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे घेणार आहेत.
मतदारसंघात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्याने चर्चा करण्यासाठी काँग्रेस आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 650 वर पोहोचली आहे तर 59 जण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनामुळे 28 जणांचा मृत्यू झाला आहे.