ETV Bharat / bharat

एसपी बालसुब्रमण्यम यांच्या अस्थी तिरुवेल्लोरच्या फार्महाऊसवर - S P Balasubrahmanyam passes away

बालसुब्रमण्यम यांची 5 ऑगस्टला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काही दिवसांनी प्रकृती खालवल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. अखेर काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

S P Balasubrahmanyam passes away
प्रख्यात गायक एसपी बालसुब्रमण्यम यांची वयाच्या 74 व्या वर्षी एमजीएम रुग्णालयात प्राणज्योत मालवली.
author img

By

Published : Sep 26, 2020, 11:25 AM IST

चेन्नई - प्रख्यात गायक एसपी बालसुब्रमण्यम यांची वयाच्या 74 व्या वर्षी एमजीएम रुग्णालयात प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच सर्व चाहत्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे सुपूत्र चरण यांनी वडिलांनी शुक्रवारी (25सप्टेंबर) रोजी दुपारी 1.04 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती माध्यमांना दिली.

प्रख्यात गायक एसपी बालसुब्रमण्यम यांची वयाच्या 74 व्या वर्षी एमजीएम रुग्णालयात प्राणज्योत मालवली.

अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. एसपी यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व चाहत्यांबद्दल चरण यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. बालसुब्रमण्यम यांच्या पाठिशी त्यांची पत्नी सावित्री तसेच चरण आणि पल्लवी ही दोन मुले आहेत.

S P Balasubrahmanyam passes away
प्रख्यात गायक एसपी बालसुब्रमण्यम यांची वयाच्या 74 व्या वर्षी एमजीएम रुग्णालयात प्राणज्योत मालवली.

बालसुब्रमण्यम यांची 5 ऑगस्टला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काही दिवसांनी प्रकृती खालवल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. 5 ऑगस्टला त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. तसेच प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. चेन्नईतील खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र मागील आठवड्यात तब्येत ढासळल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हालवण्यात आले होते.

दरम्यान, 20 ऑगस्टला विविध संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी व्हर्च्युअली एकत्र येत सामुहिक प्रार्थना केली होती. यावेळी एसपी यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. अखेर काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.