नवी दिल्ली - संचारंबदीच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून, राजधानी दिल्लीतील 30 वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांवर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. संबंधित कुटुंब नैऋत्य दिल्लीच्या वसंत कुंज येथे राहते. अभिषेक नावाच्या या तरुणाने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे, की माझ्या वडिलांना खूप वेळा सांगितले की बाहेर फिरू नका, तरीही ते बाहेर फिरत असल्यामुळे मी ही तक्रार दाखल करत आहे. विरेंद्र सिंग (वय-59) या व्यक्तीवर तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा - कोरोनाशी कर सुरु लढाई..! जनजागृतीसाठी 'ईटीव्ही भारत'चे खास मराठी गीत